दुष्काळ

शेतकऱ्यांनो पेरण्या करु नका, केंद्र सरकारची बैठक

जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय. 

Jun 26, 2014, 07:21 PM IST

पाऊस गायब, राज्यावर दुष्काळाचं सावट

राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय.

Jun 26, 2014, 06:40 PM IST

विहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती

सोलापूरतल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय, दुष्काळ ग्रस्त भागात पाण्यासाठी आठ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

Jun 20, 2014, 08:32 PM IST

बारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?

गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.

Nov 4, 2013, 02:55 PM IST

... इथे येते देवाची प्रचिती!

देव आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतात. मात्र पुणे जिल्ह्यातल्या पिंगोरी गावच्या लोकांना देव असल्याची प्रचीती आलीय...

Oct 15, 2013, 09:30 PM IST

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2013, 06:01 PM IST

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

Sep 30, 2013, 06:28 PM IST

ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

धुळे जिल्ह्यातल्या न्याहळोद गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका 56 वर्षीय शेतक-यानं आत्महत्या केलीये. मधुकर कोळी असं त्यांचं नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि नापीकीचं संकट समोर दिसत असल्याने विष पिउन त्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.

Sep 29, 2013, 11:02 PM IST

मराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!

राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.

Jul 24, 2013, 10:24 AM IST

दुष्काळात पिंपरीच्या नगरसेवकांचा ब्राझिल दौरा!

पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक जीवाचं ब्राझील करायला निघाले आहेत. राज्य दुष्काळानं होरपळतंय. पण पिंपरीतल्या असंवेदनशील नेत्यांना ब्राझीलचा दौरा महत्वाचा वाटतोय.

May 28, 2013, 08:12 PM IST

पाण्याच्या शोधात फिरणाऱ्य़ा हरिणाचा बळी

नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात पाण्याच्या शोधात फिरणा-या हरणाचा सहावा बळी गेलाय. दुष्काळामुळे जंगलातले पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत.

May 28, 2013, 06:10 PM IST

राहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर...

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

May 28, 2013, 12:56 PM IST

दुष्काळाने पळवली साखर!

राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.

May 26, 2013, 07:13 PM IST

‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`

दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.

May 21, 2013, 09:18 AM IST