देवेंद्र फडणवीस

भाजप-सेनेची चर्चा पुढे सरकलीय, एक तृतियांश वाटा

अखेर भाजप-शिवसेनेची चर्चा पुढं सरकलीय. शिवसेनेला मंत्रिमंडळात एक तृतियांश वाटा देण्यास भाजपनं तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Nov 1, 2014, 08:30 PM IST

पहिल्यांदा सांगलीच्या मंत्रीविनाच सरकारचा शपथविधी

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्वाचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून, आजपर्यंत प्रत्येक मंत्रिमंडळात सांगलीचं प्रतिनिधित्व होतं. राज्यात भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण दहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र सांगलीचा मंत्री नसणारा हा पहिलाच शपथविधी ठरलाय.  

Nov 1, 2014, 03:40 PM IST

खडसेंना विठोबा पावला, कार्तिकी एकादशीला करणार विठूरायाची पूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं करण्यात येणाऱ्या विठ्ठलाच्या पूजेचा मान नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा आणि आरती करतात. 

Nov 1, 2014, 12:48 PM IST

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह हवीत १० मंत्रिपदं, सूत्रांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप-सेनेची पुन्हा युती होण्याचे संकेत दिले आहेत. आता शिवसेना-भाजपमध्ये मंत्रिपदाच्या वाटाघाटीची चर्चा सुरू आहे. 

Nov 1, 2014, 11:07 AM IST