देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी ?

देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री आज शपथ घेणार आहेत.  

Oct 31, 2014, 11:49 AM IST

देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्या भेटीची शक्यता

भाजचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे.

Oct 31, 2014, 10:37 AM IST

युतीचा निर्णय आता शपथविधी दिनीच होणार

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची उद्या भेट होण्याची शक्यताय. शिवसेनेला बरोबर घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान दिल्लीतील भाजप नेत्यांची बैठक संपलीय. मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यात तीन तास चर्चा सुरू होती.

Oct 30, 2014, 10:16 PM IST

रेल्वे, विमानाला मागे टाकत मित्रांचा ताफा कारनं निघाला!

राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर भव्य स्टेज उभारण्यात येतोय. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वैभवाची झलक या स्टेजवर पहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर स्टेज करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.   

Oct 30, 2014, 06:52 PM IST

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग'

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेण्याबाबत इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

Oct 30, 2014, 12:05 PM IST

शिवसेनेचं भाजपला इमोशनल ब्लॅकमेलिंग

शिवसेनेचं भाजपला इमोशनल ब्लॅकमेलिंग

Oct 30, 2014, 11:24 AM IST