राज्य सरकार स्थिर : मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थिर असल्याचं म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही, एकाही आमदाराला वाटत नाही की, पुन्हा निवडणूक लढवावी, त्यामुळे सरकार स्थिर असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Nov 18, 2014, 05:07 PM ISTउद्धव ठाकरेंचं पुन्हा तळ्यात-मळ्यात, शिवसेना नेत्यांमध्येच मतभिन्नता!
महाराष्ट्रातील राजकारण सध्या आयसीयूमध्ये पोहोचलं आहे, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शिवसेना सध्यातरी विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे निभावेल असंही त्यांनी सांगितलं.
Nov 18, 2014, 03:59 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
Nov 18, 2014, 01:41 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय.
Nov 18, 2014, 12:35 PM IST'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'
'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'
Nov 18, 2014, 12:12 PM ISTफडणवीस सरकार केव्हाही ढासळणार; पवारांचं भाकीत
अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत केलंय भाजपला स्वत:हून पाठिंबा जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी...
Nov 18, 2014, 11:17 AM ISTबाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री फडणवीस
Nov 17, 2014, 06:58 PM ISTराज-उद्धव साथ साथ, ही दृश्य काय सांगतात?
Nov 17, 2014, 03:11 PM ISTशिवाजी पार्कवर आज शिवसैनिकांचा मेळा
Nov 17, 2014, 10:23 AM ISTशिवतीर्थावर सुरक्षेचा चोख बंदोबस्त
Nov 17, 2014, 10:20 AM ISTशिवसेना-भाजप एकत्र येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
‘राजकारणात चर्चेची दारं कधीही बंद होत नसतात,’ असं सूचक विधान करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. असं झालं तर मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात सेनेला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
Nov 17, 2014, 09:08 AM IST‘मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत?’
मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
Nov 14, 2014, 01:11 PM ISTमराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण टिकायलाच हवं... आणि त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
Nov 14, 2014, 12:14 PM ISTशिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात
भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे.
Nov 13, 2014, 06:16 PM ISTUPDATE : शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला
आवाजी मतदानाने झालेला विश्वासदर्शक ठराव हा अविश्वास आहे, हे घटनाबाह्य आहे, असे आरोप शिवसेनेने केले, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा का घेतला, यावरून टीका झाल्यानंतर आज पुन्हा राजकीय घडामोडी सुरूच आहेत, त्याचं क्षणाक्षणाला हे अपडेट
Nov 13, 2014, 02:03 PM IST