धनगर

आरक्षणावर घोंगड पांघरणाऱ्या सरकारला 'धनगरांची आंदोलनाची काठी'

कृती समितीच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मुंबईसह राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी आणि वसईत आंदोलनं झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम, तर जळगावात रेल्वे रोको केला जाईल, असंही सांगण्यात येतं.

Aug 14, 2014, 01:43 PM IST

राज्य सरकारकडून धनगरांना 'ठेंगा' ?

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आघाडी सरकारनं अखेर वाटाण्याच्या अक्षता लावल्यात. 

Aug 13, 2014, 11:21 PM IST

उठ धनगरा, जागा हो..अशी हाक देणाऱ्या आंदोलनाचा भडका

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू झालेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय. एकीकडं या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय, तर दुसरीकडे धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आदिवासी नेत्यांनीही दिल्लीदरबारी धडक मारलीय.

Jul 29, 2014, 09:48 AM IST

आदिवासी आणि धनगर नेत्यांमधील संघर्षही शिगेला

आरक्षणावरून आदिवासी आणि धनगर समाजातला संघर्ष शिगेला पोहचलाय. धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी नेते आणि मंत्री दिल्लीत धडकले.

Jul 28, 2014, 09:42 PM IST

धनगड आदिवासी, धनगर नव्हे - पिचड

आरक्षण घटनेनुसारच द्यायला हवे, धनगड आदिवासी आहेत, धनगर नव्हे, असे सांगत आदिवासींच्या हितासाठी मंत्रिपद पणाला लावणार आहे, असा इशारा आदीवासीमंत्री मधुकर पिचड यांनी दिला.

Jul 25, 2014, 05:47 PM IST

पोटासाठी पोटच्या पोरांचा सौदा

पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:च्या मुलांना पैशासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार राजर्षी शाहूंची नगरी असणा-या कोल्हापुरात उघडकीस आलाय. इथं राहणा-या आदिवासींनी अनेक मुलांना धनगरांना विकलंय. प्रशासनाला यासंदर्भात माहिती कळल्यानंतर त्यांनी त्यातल्या 18 मुलांची सुटका केली आहे.

Feb 6, 2013, 10:42 PM IST