निधन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचं निधन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांचं निधन झालं आहे.

Dec 6, 2016, 12:20 AM IST

'टा' चा 'सा' झाला... चौघांचा बळी गेला!

टायपिंगमधल्या साध्या चुकीमुळं जळगावच्या एका खासगी माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलीय... पगारच नसल्यानं आजारांनी ग्रस्त होऊन त्यातल्या तब्बल चार शिक्षकांचं निधन झालंय. गेंड्याच्या कातडीचं सरकार कसं वागतं, पाहूयात हृदय हेलावून टाकणार हा रिपोर्ट....

Dec 1, 2016, 07:36 PM IST

'झोंबी'कार आनंद यादव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Nov 27, 2016, 10:48 PM IST

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते नव्वद वर्षांचे होते. 

Nov 26, 2016, 12:21 PM IST

महात्मा गांधीचे नातू कनुभाई गांधी यांचं निधन

महात्मा गांधी यांचे नातू कनुभाई गांधी यांचं निधन झालं आहे. कनुभाई गांधी यांनी सूरतमध्ये रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. कनुभाई गांधी अधिक काळापासून गंभीररित्या आजारी होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Nov 7, 2016, 10:27 PM IST

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

मुंबई भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं मध्यरात्री दीडच्या सुमारास निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. 

Nov 7, 2016, 07:33 AM IST

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचे निधन

महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारेज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नाशिक येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे.

Oct 29, 2016, 04:02 PM IST

'अन्नपूर्णा'च्या लेखिका मंगला बर्वे यांचे वृद्धापकाळाने निधन

पाककलेवर आधारित अन्नपूर्णा या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या.

Oct 24, 2016, 04:56 PM IST

एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुनको तबैई यांचे निधन

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला जपानच्या जुनको तबेई यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.

Oct 23, 2016, 11:00 AM IST

'फू बाई फू'च्या रंगमंचावर अश्विनी एकबोटेंचा गाजलेला अभिनय

अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचं भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

Oct 22, 2016, 10:55 PM IST

गुणी अभिनेत्रीची अचानक एक्झिट, अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी एकबोटे यांची अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली. त्यांना अनेक मान्यवर आणि नाट्य, चित्रपटसृष्टीतून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.

Oct 22, 2016, 10:24 PM IST