एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुनको तबैई यांचे निधन

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला जपानच्या जुनको तबेई यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.

Updated: Oct 23, 2016, 12:51 PM IST
एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुनको तबैई यांचे निधन title=

टोकयो : एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला जपानच्या जुनको तबेई यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.

गेल्या चार वर्षांपासून जुनको कॅन्सरने आजारी होत्या. सैतामा शहरातील रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मे 1975मध्ये तबेई यांनी वयाच्या 35व्या वर्षी एव्हरेस्ट सर केले होते. माऊंट एव्हरेस्टवर पोहोचण्याच्या 12 दिवस आधी त्या बर्फाच्या वादळात अडकल्या होत्या. एका गाईडने त्यांना येथून बाहेर काढले. त्यानंतरही त्यांनी एव्हरेस्टचा प्रवास सुरु ठेवला.