पाकिस्तान

पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील - जनरल राहील

पाकिस्तान आज भारताला धमकी देत म्हटले की युद्धासाठी सक्षम असलेली त्याचे सैन्य कोणत्याही आक्रमणाला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.  पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या त्याला विसरू शकणार नाही. 

Nov 24, 2016, 11:05 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांची मोठी कारवाई

सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरु झाला आहे. जम्मू कश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यातील बालाकोट भागात शिवाय अलावा बीमबेर, कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने एलओसीवर मोर्टार शेल टाकले. सतत गोळीबार सुरु आहे. भारतीय सेनेने देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताने देखील हत्यारांना वापर करत पाकिस्तानी सैन्याला उत्तर देत आहेत. 

Nov 23, 2016, 12:52 PM IST

२ दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार

कश्मीरमधील बांदीपुरामध्ये जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मंगळवारी सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु होती. त्यामध्ये २ जवानांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे.

Nov 22, 2016, 09:15 AM IST

पाकिस्तानने ४३ भारतीय मच्छिमारांना घेतलं ताब्यात

पाकिस्तानने अरबी समुद्रातून त्यांच्या सीमाभागातून ४३ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतलं आहे. रविवारी त्यांना पाकिस्तानच्या सुरक्षा जवानांनी ताब्यात घेतलं. सिंध प्रांताजवळ अटक करुन मच्छिमारांना कराची येथे नेण्यात आलं. 

Nov 21, 2016, 10:06 AM IST

पाकिस्तानच्या कुरघोड्यांना भारताकडून प्रतिउत्तर

पाकिस्तानकडून भारतीय चौक्याना निशाणावर ठेऊन गोळीबार करण्यात आला, गेल्या नऊ दिवसातून तेरा वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

Nov 18, 2016, 05:41 PM IST

शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा इशारा

सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तान एलओसीवर सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान जम्मू-कश्मीरच्या सीमाभागात सतत फायरिंग करत आहे. पाकिस्तानी सेना भारतीय जवानांना निशाना बनवत आहेत. गावातील भागांना देखील पाकिस्तान सैन्याकडून निशाना बनवण्यात येत आहे. भारताने आता पाकिस्तानला या विरोधात एक पत्र दिलं आहे.  2 आणि 9 नोव्हेंबरनंतर या महिन्यात तिसऱ्यांदा विरोध पत्र देण्यात आलं आहे. सीमापलिकडे पाकिस्तानच्या चौक्यांजवळ दहशतवादी देखील जमत असल्याचं भारताने नमूद करत त्याची निंदा केली आहे.

Nov 17, 2016, 10:58 PM IST

सीमेवर पाकिस्तानचं सैन्य करतंय युद्ध सराव

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच बातमी होती की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधरावे म्हणून पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र संबंधित प्रकरणांचे सल्लागार सरताज अजीज हे भारतात येणार आहेत. पण यातच आता दुसरी माहिती येते आहे की पाकिस्तानचं सैन्य सीमेवर मिलिट्री एक्सरसाइज करत आहे.

Nov 16, 2016, 04:22 PM IST

भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे सात जवान ठार?

भारतीय लष्करानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात जवान ठार झाले आहेत.

Nov 14, 2016, 02:38 PM IST

बलुचिस्तानात 14 वर्षांच्या मुलानं घडवला आत्मघाती हल्ला, 52 ठार

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील एक प्रसिद्ध सुफी दर्ग्यात शनिवारी एका आत्मघाती हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसहीत कमीत कमी 52 जणांना आपला प्राण गमवावे लागलेत. तर या हल्ल्यात 100 हून अधिक जण जखमी झालेत. 

Nov 13, 2016, 07:05 PM IST

पाकिस्तानात होतेय १०० च्या बनावट नोटा छापण्याच्या तयारी

बनावट नोटांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठं नुकसान होतं होतं. पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात नकली नोटा या भारतात व्यवहारात आणल्या जातं होत्या. त्यामुळे मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. पण यानंतर पुन्हा नकली नोटा छापल्या जाणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Nov 11, 2016, 10:39 PM IST

24 तासात पाकिस्तानला 2 मोठे झटके

गेल्या 24 तासात जगाच्या इतिहासात दोन मोठ्या ऐतिहासिक घटना घडल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा बॉम्ब टाकला की पाकिस्तानसह काळा पैशा असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. तर दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. जगातील या दोन मोठ्या घटनांमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.

Nov 10, 2016, 04:15 PM IST

पंतप्रधानांच्या 'त्या' निर्णयाने पाकिस्तानला दणका

सगळ्यात मोठा दणका पाकिस्तानला

Nov 9, 2016, 11:06 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे शहीद

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले जवान राजेंद्र तुपेकर शहीद झाले आहेत. राजेंद्र तुपे हे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावाचे रहिवासी आहेत.

Nov 6, 2016, 09:18 PM IST