पाकिस्तान

पाकला धक्का, यूनोचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार

काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास यूनोनं नकार दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली होती. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. 

Oct 14, 2014, 03:25 PM IST

काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय. 

Oct 13, 2014, 02:44 PM IST

पाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव

जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.

Oct 12, 2014, 03:50 PM IST

पाकला दिलं प्रत्यूत्तर, पुन्हा अशी चूक करणार नाही - मोदी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी फिरताना दिसतायत. आज त्यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली. पाकिस्तानकडून सध्या सुरु असलेल्या सीजफायर उल्लंघनावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार केलाय. 

Oct 10, 2014, 03:05 PM IST

शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री

 सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.

Oct 9, 2014, 12:35 PM IST

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. 

Oct 9, 2014, 08:55 AM IST

मोदी प्रचारात, भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा - शिवसेना

 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अडकले आहेत व महाराष्ट्रातील अनेक गावांत त्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. मोदी यांची गरज दिल्लीत असताना राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना इकडे असे अडकवून ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा आहे, असा आरोप करत पण येथे सत्य बोलायचे कोणी?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.

Oct 8, 2014, 03:39 PM IST

UPDATE: पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी गृहमंत्रालयाची तातडीची बैठक

सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापाती सुरुच असून बुधवारी पहाटे पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ११ भारतीय नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.  

Oct 8, 2014, 12:02 PM IST

सीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या रणसंग्रामात उतरलेत... एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना, पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात मश्गूल असल्यानं टीकेची झोड उठलीय.

Oct 7, 2014, 07:25 AM IST

पाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी

पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.

Oct 7, 2014, 07:15 AM IST