पाकिस्तान

पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ भारतीय जवान शहीद

जम्मू - काश्मीर इथल्या सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्यानं शस्त्रसंधींचं उल्लंघन करत बुधवारी दुपारी भारतीय सैन्याच्या चौकींवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. 

Jul 16, 2014, 05:59 PM IST

पाकिस्तान सैन्याकडून सीमा भागात गोळीबार

 पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीर येथील आरएस सेक्टरमधील पिंडी आऊटपोस्टवर गोळीबार केला.

Jul 12, 2014, 04:06 PM IST

पाकिस्तानात सुरूय स्पेशल ‘कसाब क्लास’!

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबवर धडे दिले जात असल्याची माहिती उघड झाली आहे. यात कसाबनं दहशतवादी हल्ल्यांमध्ये केलेल्या चुका दाखवल्या जात असून या चूका कशा टाळता येतील यावर माहिती दिली जात आहे.

Jul 6, 2014, 10:27 PM IST

भारताचा मोस्ट वॉन्टेड सईद राजस्थानच्या सीमेवर

 भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद हा पाकिस्तानात असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदला जैसलमैर बॉर्डरजवळ संशयितरित्या फिरताना पाहिले गेले आहे.

Jul 4, 2014, 12:01 PM IST

आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी शोएबचा 'निकाह'

 

कराची : पाकिस्तानचा तेज तर्रार गोलंदाज शोएब अख्तर आता एका नव्या वादात अडकलाय. 38 वर्षांच्या शोएबनं एका 20 वर्षीय तरुणीशी विवाह केल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.

शोएबनं पख्तूनखवा प्रांतातील हरिपूर भागात राहणाऱ्या एका तरुणीशी निकाह केल्याचं एका टीव्ही चॅनल रिपोर्टमध्ये म्हटलंय. हरिपूरमध्येच हा निकाह बुधवारी पार पडल्याचं सांगण्यात येतंय.  

Jun 26, 2014, 07:55 AM IST

पाकिस्तानात विमानावर हल्ला, एक ठार दोन जखमी

पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानावर जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विमानातून उतरत असताना बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार गेला.  

Jun 25, 2014, 10:04 PM IST

आण्विक शस्त्रांस्त्रांमध्ये पाक भारतापेक्षा बलवत्तर

भारताच्या तुलनेत पाकिस्तानाकडे अणुबॉम्बचा साठा जास्त असल्याचं सांगितलं जातंय. एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रांचाही साठा जास्त असल्याचं स्टॉकहोम स्थित `इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट`च्या एका अहवालात म्हटलं गेलंय.

Jun 18, 2014, 02:01 PM IST

...आणि भारतानं पाकिस्तानचा रेकॉर्ड तोडला!

मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमध्ये झालेली मॅच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी होतीच... पण, भारतासाठी ही मॅच रेकॉर्ड बनवण्याच्यादृष्टीनंही महत्त्वाची ठरलीय.

Jun 18, 2014, 07:51 AM IST

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, मोदींचे शरीफांना उत्तर

एकीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिक गोळीबार करत असताना दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमधला शांती-संदेशांचा सिलसिला मात्र सुरूच आहे. दरम्यान, शरीफ यांनी पाठवलेल्या पत्राला मोदींनी उत्तर पाठवलंय. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याची आपल्याला आशा असल्याचं मोदींनी या पत्रात म्हटलंय.

Jun 14, 2014, 08:23 AM IST

पाकिस्तानमध्ये पुन्हा अतिरेकी हल्ला

पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची अतिरेकी हल्ल्यानं हादरली. दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आज पुन्हा हल्ला चढविण्यात आला आहे. कराचीजवळ हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Jun 10, 2014, 01:33 PM IST

... तर भारतात काय घडलं असतं

कराची एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना विमानाचं अपहरण करण्यात यश आलं असतं तर भारतात हाहाकार माजला असता. कोणकोणती शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली असत पाहूया..

Jun 9, 2014, 09:48 AM IST

कराची विमानतळावर अतिरेकी हल्ला, 23 जण ठार

पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची अतिरेकी हल्ल्यानं हादरलीये. कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या 10 अतिरेक्यांनी अचानक विमानतळावर केलेल्या या हल्ल्यात सुरक्षारक्षकांसह 23 निरपराधांचा बळी गेलाय.

Jun 9, 2014, 09:11 AM IST

17 वर्षीय मुलीसोबत लग्नाची बातमी शोएबनं नाकारली

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणारा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं आपण 17 वर्षीय मुलीशी विवाह करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. द एक्सप्रेस ट्रॅब्युन (The Express Tribune ) या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार शोएब अख्तर येत्या 22 जूनला रावळपिंडी इथं 17 वर्षीय रुबाब खानसोबत निकाह करणार आहे. मात्र ट्विट करून शोएबनं हे वृत्त म्हणजे अफवा असल्याचं म्हटलंय.

Jun 8, 2014, 09:22 AM IST