पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. 

Updated: Oct 9, 2014, 08:55 AM IST
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच    title=

जम्मू: जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. 

भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीतील ३७ चौक्यांवर तोफा डागल्या. त्यात १५ पाकिस्तानी मारले गेले. पाकिस्तानी तोफा थंडावतील तेव्हाच चर्चा होऊ शकेल, असा पवित्रा भारतानं घेतला आहे.

पाकिस्तानचा गोळीबार पूर्णपणे थांबेपर्यंत प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. प्रत्युत्तर कसे आणि किती काळ द्यायचे याचे अधिकार बुधवारी दिल्लीत लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांच्यासमवेत झालेल्या विशेष बैठकांनंतर केंद्र सरकारनं लष्कराला दिले आहेत. 

संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांशी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी लष्करप्रमुखांशी चर्चा केली. याआधी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (लष्करी महासंचालक) पातळीवर आठ मिनिटं चर्चा झाली, पण परस्परांवर गंभीर आरोप झाल्यानं तोडगा निघू शकला नाही. 

पाककडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमाभागांतील आठ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे़ मंगळवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैन्यानं १९२ किमी लांबीच्या सीमेवरील ५० सीमा चौक्या आणि ३५ निवासी वस्त्यांना लक्ष्य करीत तुफान गोळीबार चालवला आहे़

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.