दाऊदचा व्याही म्हणतो, सचिन निवृत्तीने काही फरक पडत नाही !

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीने भारताला काही फरक पडणार नाही, असे बेधड वक्तव्य दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 12, 2013, 11:38 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीने भारताला काही फरक पडणार नाही, असे बेधड वक्तव्य दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने केले आहे.
सचिनची जागा घ्यायला भारतीय संघात नवोदीत खेळाडू आहेत. सचिनने निवृत्तीचा निर्णय घेण्यास उशीरच केला, असा खोचक सवालही मियांदाद याने केला आहे. सचिनच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत बोलताना मियांदाद यांने स्वत:चे उदाहरण दिले, तो म्हणाला, खेळातून निवृ्ती घेण्याचा एक योग्य काळ असतो आणि मला वाटतं सचिनने निवृत्त होण्यास जरा जास्तच वेळ घेतला आहे. मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा माझ्याबाबत कोणतेही लेख वगैरे आले नाहीत, मी निवृत्ती घ्यावी असं लोकं ब-याच काळापासून सांगत होते, त्यामुळे मी जेव्हा निवृत्त झालो.
माझ्याबद्दल कोणीच काही बोललं नाही. तसचं काहीस सचिननेही केलं आहे, असं मला वाटतं. कदाचित माझं हे बोलण कोणाला आवडणार नाही, पण सचिन गेल्यावर त्याची कमी जाणवणार नाही, कारण त्याची जागा घ्यायला अनेक जण आले आहेत. सचिनने निवृत्ती घ्यावी, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून होत आहे असे सांगत आता तो निवृत्त होत आहे, त्याच्या जाण्यामुळे काही फरक पडणार नाही, असेही मियांदाद म्हणाला.
मी जेव्हा निवृत्त झालो, तेव्हा माझ्याबद्दल कोणी काहीही बोललं नाही. मी कसोटीमध्ये ८ हजारांहून अधिक धावा केल्या होत्या, मी एक लिजंड होतो, तरी माझ्याबद्दल कोणीच बोललं नाही. सचिनने देशासाठी खूप काही केलयं यात काही शंका नाही. पण त्याला देशातील लोकांचा किती सपोर्ट मिळाला, हे पाहणेही महत्वाचे आहे. असा पाठिंबा मिळणेही खूप महत्वाचे असते, असे सांगून खंतही व्यक्त केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.