पाकिस्तान

भारतीय युवकाचे मोदींना पत्र, पाकिस्तानात भूकंप

एका भारतीय युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पाकिस्तानात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भविष्यवाणी वर्तवली आहे की, २०१७च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये हिंद महासागरात भूकंप आणि त्सुनामी येणार आहे.

Nov 5, 2017, 07:12 PM IST

भारताच्या विजयाने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आनंद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संघर्ष असो वा क्रिकेटच्या मैदानावरील सामना...दोन्ही ठिकाणी तणाव हा असतोच. त्यामुळे या दोन देशांपैकी एखाद्या देशाने सामना जिंकल्याबद्दल दुसऱ्या देशाने त्यांना शुभेच्छा दिल्या असे कधी घडत नाही. 

Nov 3, 2017, 07:13 PM IST

इस्राईलच्या सहकार्याने भारताचा चीन, पाकला दणका

भारताने जबरदस्त खेळी करत एकाच दणक्यात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे.

Nov 1, 2017, 07:44 PM IST

भावाच्या प्रेमाची शिक्षा बहिणीला... निर्वस्र करून काढली धिंड

पाकिस्तानमध्ये मानवतेला काळिमा फासणारी एक घटना घडलीय. भावानं प्रेम केलं म्हणून त्याची शिक्षा बहिणीला दिली गेली... ही शिक्षा म्हणजे या बहिणीला निर्वस्र करून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं.

Nov 1, 2017, 04:27 PM IST

अमेरिका आणि पाकिस्तानातील संबंध बिघडले, हेलिकॉप्टर केले परत

चीनसोबत वाढत्या मैत्रीनंतर पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कडूपणा आला आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला थारा दिल्याने पाकिस्तानची निंदा करत तीव्र कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवणारे पाच हेलिकॉप्टर अमेरिकेला परत केले आहे.

Oct 31, 2017, 04:22 PM IST

पाकिस्तानच्या या गोलंदाजाने बनवला रेकॉर्ड

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी -20 मालिका सुरू आहे. पाकिस्तानने 7 गडी राखून पहिल्या सामन्यात विजय मिळवला. सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज फहीम अश्रफने मोठी कामगिरी केली आहे. पाकिस्तानकडून टी-20 सामन्यात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.

Oct 28, 2017, 11:01 AM IST

अमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

Oct 27, 2017, 11:02 PM IST

जवान चंदू चव्हाण दोषी, तीन महिन्यांचा तुरुंगवास

सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेय.

Oct 26, 2017, 10:26 AM IST

उरीमध्ये भारताचे पाकड्यांना जशास तसे उत्तर

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या उरीतील कमलकोट भागात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. सकाळी ११ च्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले.

Oct 22, 2017, 06:52 PM IST

अवघ्या १४ महिन्यांत हा पाकिस्तानी गोलंदाज बनला वर्ल्ड नंबर वन

पाकिस्तानी संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करत आहे. दुबईमध्ये सुरु असलेल्या मालिकेत पाकिस्तानने ४-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात पाकिस्तानच्या एका गोलंदाजाचा मोठा वाटा आहे. 

Oct 22, 2017, 09:05 AM IST

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ८ नागरिक जखमी

संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली नापाक वृत्ती दाखवली आहे. जम्मू काश्मिरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिकच्या गावांवर, पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात ८ नागरिक जखमी झाले. यात एका 2 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

Oct 18, 2017, 11:16 PM IST

...जेव्हा नोबेल विजेती मलाला दिसली 'जीन्स'मध्ये!

लहान मुलांच्या खासकरून मुलींच्या शिक्षणासाठी कट्टरतावाद्यांशी शांततेच्या मार्गाने दोन हात करणारी पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजई नुकतीच जीन्समध्ये दिसली... मलालाचा हा फोटो थोड्याच वेळात इंटरनेटवर वायरल झाला नसता तरच नवल...

Oct 17, 2017, 05:29 PM IST