पॅरोल

संजूबाबा पुन्हा जेलबाहेर, १ महिन्याची रजा!

अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा तुरूंगाबाहेर आलाय. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. त्यावरुन बराच वादही झाला होता. मात्र त्यानंतरही आज पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून संजय दत्त आज बाहेर पडलाय.

Dec 21, 2013, 12:53 PM IST

पॅरोल म्हणजे काय रे संजूभाऊ!

संजय दत्तला यावेळी त्याला तब्बल महिनाभर म्हणजेच ३० दिवस सुट्टी मिळणार आहे. पत्नी मान्यताची प्रकृती ठीक नसल्याने पॅरोल मंजूर झाला आहे. उद्या सकाळी संजूबाबा पुन्हा जेलबाहेर येईल.

Dec 7, 2013, 02:27 PM IST

मुन्नाभाईची रजा संपली, आज पुन्हा जेलमध्ये रवानगी?

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्तची आज येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. संजय सध्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर आहे.

Oct 29, 2013, 08:15 AM IST

संजूबाबाचा पॅरोल रजेच्या अर्जावर निर्णय तूर्तास लांबला!

आपली पत्नी मान्यता हिच्या आजारपणाचं कारण पुढे करून संजय दत्तनं पॅरोलसाठी अर्ज दाखल केलाय. परंतु या अर्जावर देण्यात येणारा निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.

Sep 18, 2013, 12:19 PM IST

‘मुन्नाभाई’ला दिलासा मिळणार?

येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला मुन्नाभाई अर्थात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं विभागीय आयुक्त कार्यालयात पॅरोलसाठी अर्ज दाखल केलाय. या अर्जांवर पोलिसांकडून मत आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

Aug 20, 2013, 08:07 AM IST