पॅरोल

संजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला पुन्हा सुट्टी हवीय. संजय दत्तनं कारागृह विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे १४ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला असून या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.  

Jun 16, 2015, 12:15 PM IST

जेलवारी टाळण्यासाठी त्यानं केला खून...

स्वतःची जेलवारी टाळण्यासाठी थेट खूनासारखं टोकाचं पाऊल उचललेल्या कुख्यात गुंडाला, कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिताफीनं अटक केली आहे. कितीही पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला तरी, गुन्हा लपून राहत नाही हेच यातून पुन्हा एकदा दिसून आलंय.

May 26, 2015, 09:25 PM IST

'डॅडी'ची पॅरोलवर सुटका, डॉन मुलाच्या लग्नाला हजर

माजी आमदार आणि गँगस्टर डॉन अरुण गवळी आता त्याच्या मुलाच्या लग्नाला हजर राहू शकणार आहे. डॉनला 15 दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली असून आज त्याची सुटका करण्यात आलीय.

May 5, 2015, 05:31 PM IST

अरूण गवळीचा आता पॅरोलसाठी अर्ज

 मुलाच्या लग्नात हजर राहण्यासाठी गुंड अरूण गवळीने आता पॅरोलसाठी अर्ज केला आहे, पॅरोलसाठी अरूण गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

Apr 27, 2015, 11:37 PM IST

‘फर्लो’ रजेचा घोळ, संजय दत्तच्या शिक्षेत वाढ!

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त रजा (फर्लो) संपल्यानंतरही तुरुंगात हजर न झाल्यामुळं त्याच्या शिक्षेत आता आणखी चार दिवसांची वाढ होणार आहे. तसंच ‘फर्लो’च्या मुदतवाढीसाठी संजय दत्तनं केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत घोळ घालणार्‍या अधिकार्‍यांवरही कडक कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सांगितलं.

Feb 19, 2015, 08:12 AM IST

संजूबाबाची पॅरोल रजा संपली

पत्नी मान्यताच्या उपचारांसाठी तुरूंगाबाहेरवर असलेल्या संजय दत्तच्या पॅरोलची मुदत आज संपत आहे. पत्नी मान्यताच्या आजारासाठी संजय दत्त २१ डिसेंबरपासून पॅरोलवर आहे.

Mar 21, 2014, 10:10 AM IST

संजय दत्तला स्पेशल ट्रीटमेंट का - मुंबई हायकोर्ट

संजय दत्तला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का, अशी विचारणा करत मुंबई हायकोर्टानं सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. संजय दत्तला सतत पॅरोल दिलं जातंय, त्याबद्दल जनतेमध्ये संताप आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे.

Feb 26, 2014, 09:20 AM IST

संजय दत्तला शेवटची पॅरोल रजा मंजूर

अभिनेता संजय दत्त याला पुन्हा एकदा वाढीव पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. पत्नी मान्यता दत्त हिच्या आजारपणाच्या निमित्तानं त्याला आणखीन महिनाभराची वाढीव रजा मंजूर झालीय.

Feb 18, 2014, 04:12 PM IST

अभिनेता संजय दत्तला वाढीव पॅरोल

अभिनेता संजय दत्तला वाढीव पॅरोल मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. संजय दत्तची पत्नी मान्यताच्या आजारपणाचं तथ्य समजावून घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल खार पोलिसांकडे सादर केलाय.

Feb 13, 2014, 11:17 AM IST

पॅरोल वाढविण्यासाठी संजय दत्तचा पुन्हा अर्ज

१९९३ सालातील मुंबई बॉम्बस्फोटातील आर्म्स अॅक्टनुसार, सध्या शिक्षा भोगणारा सिने अभिनेता संजय दत्त यानं पुन्हा एकदा आपल्या पॅरोलच्या मुदतीत वाढ करण्यासाठी अर्ज केलाय

Feb 9, 2014, 05:21 PM IST

संजूबाबाला मिळाली आणखी १ महिना सुट्टी वाढवून

संजय दत्तला दिलासा मिळालाय. संजय दत्तची पॅरोलची मुदत ३० दिवसांनी वाढवण्यात आली. मान्यता दत्तच्या उपचारासाठी त्याला मुदत वाढवून देण्यात आलीय.

Jan 20, 2014, 01:38 PM IST

संजय दत्तकडून आणखी महिनाभर सुटीसाठी अर्ज

अभिनेता संजय दत्तने आणखी महिनाभर सुट्टी वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. संजय दत्त सध्या पॅरोलवर येरवडा जेलमधून घरी आला आहे.

Jan 11, 2014, 09:20 AM IST