फरार

दिल्लीत 'आप'चा आमदार फरार घोषित

 आपच्या नेत्यांनी दिल्लीत दिवे लावायला सुरूवात केली आहे. कारण आपच्या एका आमदाराला पोलिसांनी आज फरारी घोषित केले आहे, आमदार जर्नेलसिंग यांच्यावर सरकारी अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आमदार जर्नेलसिंग यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

May 5, 2015, 01:34 PM IST

नही मामू से नकटे मामू अच्छे... दोघांना अटक

एक आठवडा उलटला तरी नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या पाच कैद्यांचा अतापता अजून पोलिसांना लागलेला नाही. ते मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशात फरार झाल्याचं समजतंय. नाही म्हणायला त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघा गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलीय.

Apr 8, 2015, 11:55 AM IST

24 तास उलटले तरीही नागपूरचे 'ते' पाच कैदी फरारच

24 तास उलटले तरीही नागपूरचे 'ते' पाच कैदी फरारच

Apr 2, 2015, 11:25 AM IST

शूsss... नागपूर पोलीस झोपलेत!

नागपूरच्या सेंट्रल जेलमधून पाच अट्टल गुंड फरार झाल्यानं एकच धावपळ उडालीय. आधीच वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळं उपराजधानी त्रासलीय. आता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, कैदी फरार झाल्यानं सरकारची चांगलीच नाचक्की झालीय.

Apr 1, 2015, 10:37 AM IST

नागपूरच्या कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार झालेत. यापैकी सत्येद्र गुप्ता, मोहम्मद शोएब, बिनेश उईके हे तिघे मोक्काचे आरोपी असून त्यांच्यावर प्रत्येकी २० ते २५ गुन्ह्यांची नोंद आहे. 

Mar 31, 2015, 06:18 PM IST

मध्यप्रदेश जेलमधून फरार झालेले अतिरेकी जळगावात वास्तव्यास?

 मध्यप्रदेशातल्या जेलमधून फरार झालेले सिमी या प्रतिबंधित अतिरेकी संघटनेचे ५ अतिरेकी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यासाठी दहशतवाद विरोधी पथकानं नुकतीच जळगावात येऊन चौकशी केल्याचं समजतंय.

Dec 12, 2014, 03:33 PM IST

रक्षकाच्या डोळ्यात मिरचीची पूड, बालसुधारगृहातून तीन फरार

रक्षकाच्या डोळ्यात मिरचीची पूड, बालसुधारगृहातून तीन फरार

Dec 3, 2014, 09:52 PM IST

मनसेचे आमदार राम कदम फरार

महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना गौतम बुद्धांच्या अस्थी प्रकरण चांगलेच भोवलं आहे. आमदार राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Apr 24, 2014, 07:36 AM IST

फरार नारायण साईचा `राजकीय पक्ष`

गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.

Nov 8, 2013, 11:23 AM IST