भ्रष्टाचार

'पल्स पोलिओ'त भ्रष्टाचार, कधी घडणार 'साक्षात्कार'?

धुळे जिल्ह्यात NRHM योजनेत निकृष्ट दर्जोचे साहित्य खरेदी करुन आणि त्याचं बनावट बिल बनवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. यासंदर्भात वर्षभरानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीतील सदस्य आणि त्यांचा कारभार पाहता हा चौकशीचा फार्स आहे का अशी शंका उपस्थित होते.

Jul 15, 2012, 04:31 PM IST

सोमय्यांनी ठोठावलं पंतप्रधान कार्यालयाचं दार

किरीट सोमय्या यांनी येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील सहा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर आणण्याचा दावा केलाय. महाराष्ट्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्या जमिनीच्या सात बाराचे उतारे किरीट सोमय्यांनी पंतप्रधानाच्या कार्यालयात दिले. इतके पुरावे असूनही का कारवाई होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

Jul 11, 2012, 11:14 AM IST

काँग्रेसमध्ये गटबाजी चालूच राहील- दिग्विजय सिंग

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी वाढतच्या भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त करत असतानाच काँग्रेसमधील गटबाजीवरही भाष्य केलं. याशिवाय भाजपाने आपल्यावर केलेल्या कुठल्याच आरोपांचा पुरावा भाजपाकडे नसल्याचाही दावा केला.

Jul 2, 2012, 09:05 AM IST

योजनेचे पैसे गेले बुडाले 'विहिरी'त!

शेतक-यांचा उत्कर्ष व्हावा या उद्दात हेतूनं सरकारकडून अनेक योजना अंमलात आणल्या जातात. परंतु सरकारी बाबूंच्या खाबुगिरीमुळं या योजनांचा कसा बट्टयाबोळ होतो. याचं उदाहरण गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात दिसून आलं.

Jun 20, 2012, 04:44 PM IST

टीम अण्णांना पंतप्रधानांचं प्रत्युत्तर

पंतप्रधानांवर टीम इंडियाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना पाच पानांचं सविस्तर पत्र पाठवण्यात आलं आहे.

Jun 10, 2012, 09:43 AM IST

जलसंपदामंत्र्यांच्या मुलांच्या नावे करोडोंची संपदा!

विविध घोटाळ्यांमुळं राज्य सरकार चर्चेत असताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे त्यांच्या मुलांच्या नावे असलेल्या संपत्तीमुळं चर्चेत आलेत. तटकरे यांच्या दोन मुलांच्या नावे ३८ कंपन्या असल्याचं उघड झालंय.

Jun 6, 2012, 02:47 PM IST

'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग

भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.

Jun 1, 2012, 04:51 PM IST

'पंतप्रधानांबद्दल आदर, पण चौकशी व्हायलाच हवी'

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्यानंतर टीम अण्णानं या आरोपांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केलीय. इतकंच नाही तर, हे आरोप खोटे ठरले तर आपल्याला खूप आनंद होईल, असंही टीम अण्णानं म्हटलंय.

May 30, 2012, 06:48 PM IST

टीम अण्णा पुन्हा आक्रमक, पंतप्रधानांवरही आरोप

टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले १५ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.

May 26, 2012, 03:15 PM IST

अण्णांचा हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. हर्षवर्धन पाटील यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचं अण्णांनी म्हटलंय.

May 11, 2012, 06:38 PM IST

गणपतीपुळे देवस्थान कमिटीवर भ्रष्टाचाराचे आरोप

भक्तांना पावणारा म्हणून गणपतीपुळेचा स्वयंभू गणेश प्रसिद्ध आहेच. परंतु भक्तांच्या देणग्यांमुळं गलेलठ्ठ झालेल्या तिथल्या देवस्थानचा कारभारही आता चर्चेत आलाय. ग्रामस्थांनीच देवस्थान कमिटीवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं खळबळ माजली आहे.

May 4, 2012, 09:26 PM IST

मेडिकल कॉलेजेसमध्ये जागांची विक्री!

राज्यात मेडिकल कॉलेजेसमध्ये जागांची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोपाची चौकशी होणार आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी केली आहे.

Apr 16, 2012, 10:56 PM IST

कॅगचा अहवाल झी 24 तासकडे, बड्या माशांवर ठपका

कॅगचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलाय. या अहवालात अनेक मंत्र्यांचे बुरखे फाटले आहेत. मंत्र्यांनी जमीनी आणि फ्लॅट्स लाटल्याचं या अहवालातून उघ़ड झालंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला नऊ कोटींची जमीन नऊ लाखांना देण्यात आलीय.

Apr 4, 2012, 11:25 PM IST

नितीश ठाकूरकडे १८० नव्हे ३७५ कोटींचे घबाड!

रायगडचा निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याची मालमत्ता ३७५ कोटींहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोर्टात वकिलांनी तशी माहिती दिली आहे.

Mar 15, 2012, 06:58 PM IST

रायगडच्या उपजिल्हाधिकाऱ्याकडे कोटींचं घबाड

रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकुरांकडे ११८ कोटींचं घबाड सापडलंय. ठाणे लाचलुचपत विभागानं २६ ठिकाणी जप्तीची कारवाई सुरु केली आहे. मुंबईसह कोकणभर ठाकूरची काळी माया पसरलीय.

Mar 14, 2012, 04:08 PM IST