मनसे

'भाजपतील महाराष्ट्रद्रोह्यांना रोखण्यासाठी 'ते' नगरसेवक शिवसेनेत'

मुंबई महापालिकेतील शिवसेनेची म्हणजे मराठी माणसाची सत्ता उखडून फेकण्याची भाषा ‘भाजपा’तील काही महाराष्ट्रद्रोहय़ांनी करताच हे नगरसेवक शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटले. आम्ही यास फाटाफूट, तोडफोड किंवा पक्षांतर वगैरे मानायला तयार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकाऊन सांगितले आहे.

Oct 23, 2017, 08:18 AM IST

मनसेच्या आंदोलनाचा बार फुसकाच

मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलनं शनिवारी ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाची स्टंट बाजी केली. 

Oct 23, 2017, 12:18 AM IST

रामदास आठवलेंनी दिले मनसेला आव्हान

फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्याक आंदोलन करणाऱ्या मनसेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे. 

Oct 22, 2017, 05:41 PM IST

फेरीवाले हटाव आंदोलन; मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत फेरीवाले हटाव आंदोलन सुरू केले. या आंदोलनावरूनच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 22, 2017, 12:45 PM IST

मुंबईत विविध ठिकाणी फेरीवाल्यांविरूद्ध मनसेचे आंदोलन

राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणी फेरिवाल्यांविरोधात आंदोलन केले. मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी केलेल्या आंदोलनात फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानाचीही नासधूस केली.

Oct 22, 2017, 09:24 AM IST

वसईतही मनसेचा फेरीवाल्यांना दणका

वसईत रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना आज मनसेने हुसकावून लावल आहे.  

Oct 21, 2017, 06:47 PM IST

मनसे आंदोलनाचा फज्जा, फेरीवाल्यांचा पुन्हा रेल्वे स्थानकात बाजार

 ठाणे नंतर कल्याण डोंबिवली येथे ही मनसेनं फेरीवाल्यानविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पाठ वळल्यानंतर पुन्हा फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात दिसू लागलेत. त्यामुळे ही मनसेची स्टंटबाजी होती का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Oct 21, 2017, 02:52 PM IST

फेरीवाला हटाव मोहीम, कल्याणमध्येही मनसे आक्रमक

ठाण्यानंतर आता मनसेनेने आता कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपला मोर्चा वळलाय. मनसेनेने फेरीवाल्यांना दणका देत खळ्ळ खट्याक केलेय.

Oct 21, 2017, 01:44 PM IST

ठाण्यात मनसेचे खळ्ळ खट्याक, फेरीवाल्यांना दिला चोप

रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. त्याचवेळी मांडलेल्या स्टॉल्सची तोडफोड करण्यात आली. 

Oct 21, 2017, 10:26 AM IST