अजितदादांनी सोडला पदभार, तरी सोडवत नाहीत अधिकार
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद सोडलं...मंत्रीपदं सोडली... मात्र, त्याबरोबरचे अधिकार सोडायला अजित पवार तयार दिसत नाहीत. याचा प्रत्यय पुण्यात आला. धरणातील पाणी वाटप करणाऱ्या कालवा समितीची बैठक झाली. या बैठीकीला आमदार म्हणून अजित पवार उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर देखील अनेक अधिकारी अजित पवारांना भेटायला येत होते.
Oct 8, 2012, 09:37 PM ISTराजीनामा तोंडावर फेकला- अजित पवार
माझी बदनामी करण्यासाठी मीडियाचा वापर केला जात आहे - अजितदादा
विरोधक जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत - अजितदादा
पवार साहेबांवरही खोटे आरोप केले जात आहेत - अजितदादा
राजीनामा विषय संपला - शरद पवार
राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याच्यावर आता पडदा पडल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. राजीनाम्याचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कधीच संपला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
Sep 27, 2012, 01:47 PM ISTदादांचा राजीनामा काकांनी स्वीकारला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप झाला. त्यामुळे सरकार जाणार की राहणार याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला कोणताही धोका नाही, असे आधीच स्पष्ट केले होते. मात्र, आज अजित पवारांचा राजीनामा काका शरद पवार यांनी स्वीकारला आणि राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे.
Sep 27, 2012, 12:22 PM ISTअजित पवार आक्रमक, आता माघार नाही!
मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे तो मागे घेण्याचा प्रश्नच नाही. आता माघार नाही. सरकारमध्ये पुन्हा पद घेण्याचा विचार नाही. पक्ष मजबूत करण्याला प्राधान्य देऊ, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.
Sep 27, 2012, 08:31 AM ISTमहाराष्ट्राचा नवा सिंघम!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय... ते वादळ ज्यांच्यामुळं आलंय त्या व्यक्तीचं नाव आहे विजय पांढरे... राज्याच्या सिंचनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीवर त्यांनी बोट ठेवलं आणि त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. पण कोण आहेत हे पांढरे? त्यांनी सिंचन खात्यावर कोणते आक्षेप घेतलेत? आध्यात्माशी काय आहे पांढरेंचं नातं? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ‘महाराष्ट्राचा नवा सिंघम!’ या झी २४ तास स्पेशलमध्ये…
Sep 26, 2012, 10:22 PM ISTअजितदादांचा राजीनामा मंजूर होणार- शरद पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात येणार असून अजित पवार यांनी एक धाडसी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केली.
Sep 26, 2012, 06:02 PM ISTराज्याच्या राजकारणात परतणार नाही - सुप्रिया सुळे
राज्याच्या राजकारणात परतण्यास उत्सुक नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.
Sep 26, 2012, 05:18 PM IST‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं’
`मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला बळी पडू नये... खरोखरच राजीनामा देण्याचं अजित पवारांनी दाखवलं असेल तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं`
Sep 25, 2012, 08:19 PM ISTमंत्र्यांचे राजीनामे दबावाची खेळी नाही - शरद पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादीमध्ये तर आता दादांच्या राजीनाम्याचा दुसरा अंक सुरू झालाय. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत.
Sep 25, 2012, 07:42 PM ISTअजितदादांचा राजीनामा ही तर नौटंकी - राज ठाकरे
`अजित पवारांचा राजीनामा ही तर नौटंकी आहे.` असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
Sep 25, 2012, 05:47 PM ISTराजीनामा दिला, अजितदादा म्हटले तरी काय?
अजित पवार स्वच्छ आहे, लवकरच सिद्ध होईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला राजीनामा.
Sep 25, 2012, 05:28 PM ISTसुरेश पठारेंची हकालपट्टी झाली- सप्तर्षी
सुरेश पठारेनी राजीनामा दिलेला नाही. तर, त्यांना काढण्यात आल्याची शक्यता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केलीय.
Sep 23, 2012, 09:30 PM ISTसुरेश पठारेंचा अण्णांच्या आंदोलनाला राम-राम
पठारे यांनी आपला भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा त्यांचा राजीनामा अण्णांकडे सोपवला असून अण्णांनी पठारेंचा राजीनामा मंजूर केला आहे.
Sep 22, 2012, 10:51 PM ISTअखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड
तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले.
Sep 21, 2012, 04:59 PM IST