लोकशाहीला धक्का नको - राष्ट्रपती
भारतीय संसदेने सामान्य लोकांच्या प्रगती आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले आहेत. सरकारनेही अनेक योजना आणल्या आहेत. मात्र, लोकशाही व्यवस्था कोसळणार नाही याची काळजी कोणतीही सुधारणा करताना घेतली पाहिजे, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले. ६३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून त्या बोलत होत्या.
Jan 26, 2012, 09:03 AM ISTनौदलाच्या ताफ्यात ८० नव्या युद्ध नौका
नौदलाच्या ताफ्यात येत्या दोन वर्षात ८० नव्या युध्दा नौका दाखल होणार आहेत. या ताफ्यात विमानवाहू तसंच अणवस्त्र सज्ज पाणबुड्यांचा देखील समावेश आहे. नौदलाच्या युध्द नौकांच्या ताफ्याचे सरासरी वय या नव्या युध्द नौकांच्या समावेशामुळे कमी होणार असल्याचं नौदलाचे प्रवक्ते कमांडर पी.व्ही.एस.सतीश यांनी सांगितलं.
Dec 20, 2011, 02:33 PM IST