डोंबिवलीत सोनसाखळी चोराला ५००-६०० जणांच्या जमावानं बेदम मारहाण केलीय... जमावातील एकानं चोरावर गोळीही झाडली...
पिंपरी-चिंचवडच्या एव्हरेस्ट सर करणाऱ्या वीरांना महापालिकेनं आर्थिक मदतीची घोषणा करूनही अजून कसलीही मदत केली नाही.
सेंद्रीय खतांचा करा वापर
शिर्डीत दिडशे कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या साई आश्रमचं पुढील महिन्यात उद्घाटन होणार आहे. पाहुयात... कसं असेल हे साई आश्रम...
अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला
पिंपपरी-चिंचवडमध्ये अभिरूप सभा घेण्यात आली. मात्र, अजित पवार याना निमंत्रण नसल्याने चर्चेचा विषय होता.
ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाचा छडा लागलाय. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पुणे बॉम्बस्फोटातल्या तीन संशयितांना अटक केलीय. त्यांना मुंबईत बॉम्बस्फोट करायचा होता, अशी माहिती पुढे आली आहे.
पुण्यातल्या येरवडा जेलमधील कातील सिद्दीकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी बॉम्बस्फोट केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. यातला सय्यद फिरोज पुण्यातला आहे. असद आणि इम्रानला २६ सप्टेंबरलाच अटक करण्यात आली होती.
रायगड जिल्ह्यात विहिरींचे काम पूर्ण झाले तरी अद्यापी अनुदान देण्याचे टाळण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.
भंडाऱ्यातील गोसीखुर्द हा प्रकल्प रखडला आहे. त्यातच या प्रकल्पाचे काम निकृष्ट झाले आहे. कोट्यवधी रूपये पाण्यात गेल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही.