विद्याचा भाव होणार 'बुम्बाट'
बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या मानधनाचा आकडा त्यांच्या लोकप्रियतेनुसार वाढत जातो आहे. डर्टी पिक्चरनंतर सगळीकडेच बोलबाला असेलेल्या विद्या बालनच्या मानधनाचा आकडाही लवकरच दुप्पट होणार आहे. बॉलिवूड स्टार्सचं मानधन हा तर नेहमीच चर्चेचा विषय असतो.
Jan 3, 2012, 08:30 PM ISTबॉलिवूडसाठी यंदाचे वर्ष लगीनघाईचे
नवीन वर्ष बॉलिवूडसाठी लग्नाच्या धामधुमीचं असणार आहे. बॉलिवूडमधली पेअर सैफ अली खान आणि करिना कपूर तसंच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी येत्या वर्षात विवाह बंधनात अडकण्याचं निर्णय जाहीर केला आहे. सैफ आणि करिना ज्यांना सैफिना असं प्रेमाने म्हटलं जातं त्यांची रिलेशनशीप पाच वर्ष जुनी आहे.
Dec 31, 2011, 08:21 PM IST'विधान भवन' ते ‘विद्या बालन’
नागपूरच्या थंडीत अधिवेशनाचं कामकाज तापलं असताना काल रात्री अनेक पक्षांच्या आमदारांनी विरंगुळ्यासाठी थेट थिएटर गाठलं आणि ‘डर्टी पिक्चर’ पाहिला. विद्याच्या मादक अदांमध्ये गुंग असतानाच मीडिया तिथे पोहोचली, तेव्हा आमदारांचीही पळापळ झाली.
Dec 17, 2011, 03:16 AM ISTबालन फिवर आता बॉलिवूडमध्ये
सध्या बॉलिवूडमध्ये विद्या म्हणजे सिनेमाची वन वुमन आर्मीच आहे, असं बोललं जातंय. म्हणूनच खान फॅक्टर सारखाच बालन फॅक्टर आता बॉलिवूडमध्ये रुजायला लागणार असंच दिसतंय.
Dec 9, 2011, 11:58 AM ISTविद्या बालन नायिका नव्हे नायक
एकेकाळी श्रीदेवीला लेडी बच्चन म्हणायचे आता विद्या बालनला भविष्यात लेडी शाहरुख म्हणावं लागेल अशी चिन्हं आहेत. विद्या बालन हिंदी सिनेमाची नवा हिरो आहे. वाक्य वाचून धक्का बसला असेलच पण द डर्टी पिक्चरने तिकिटबारीवर अवघ्या पाच दिवसात ३९ कोटी रुपयांचा छनछनाट करुन दाखवला आहे.
Dec 8, 2011, 05:53 PM ISTविद्याचा भाव वधारला !
'डर्टी पिक्चर'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विद्याने आपली फी आणखी वाढवलीय. आता विद्याने आपलं मानधन केलंय दोन कोटी रुपये. डर्टी पिक्चरनंतर विद्याच्या हाती असलेला नवा प्रोजेक्ट म्हणजे सुजॉय घोषची 'कहानी' ही फिल्म.
Dec 8, 2011, 02:49 AM ISTविद्या बालन बॉक्स ऑफिसवर डॉन ठरणार का?
विद्या बालनचा द डर्टी पिक्चर, अक्षय-जॉन अब्राहाम देसी बॉईज आणि शाहरुख खानचा डॉन 2 हे तीन सिनेमे वर्षा संपता संपता प्रदर्शनाच्या वाटेवर आणि चर्चेत आहेत. पण या क्षेत्रातील जाणकारांनी डर्टी पिक्चर बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करून दाखवेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
Nov 19, 2011, 11:30 AM IST