विधानसभा निवडणूक

गोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप

मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.

Mar 6, 2012, 11:10 AM IST

पाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

देशातील उत्तर प्रदेशसहित उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर युतीत सपा ४ जागांवर पुढे आहे.

Mar 6, 2012, 08:19 AM IST

गोव्यात विधानसभेसाठी उद्या मतदान

गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असून ३ मार्चला मतदान होणार आहे. ४० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रथमच ममता बॅनर्जींच्या तृणमूलने उडी घेतली आहे. त्यामुळे गोव्याकडे लक्ष लागले आहे.

Mar 2, 2012, 11:28 AM IST

उत्तर प्रदेशात ६० टक्के मतदान

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यासाठीचे ६० टक्के मतदान शांततेत पार पडले. मतदानासाठी सकाळी मतदानकेंद्रांसमोर रांगा लावल्या आहेत. यात एकूण एक कोटी ९७ लाख लोक मतदान करणार असून, ५९ मतदारसंघ आहेत.

Feb 11, 2012, 11:14 PM IST