सुधीर मुनगंटीवार

'गडकरींची राज्यात परतण्याची इच्छाच नाही'

'गडकरींची राज्यात परतण्याची इच्छाच नाही'

Oct 25, 2014, 11:23 PM IST

मुनगंटीवारांना देवेंद्र नको, गडकरी हवेत... मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी मुख्यमंत्रीपदासाटी भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण मात्र सुरु झालंय.

Oct 21, 2014, 05:30 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू...

भाजप अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवण्यात नितीन गडकरींना अपयश आल्यानंतर महाराष्ट्र भाजपमधली समीकरणंही बदललीत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी एक महत्त्वाची बैठक विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या घरी पार पडतेय.

Feb 5, 2013, 02:47 PM IST

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचे डोके फिरले - मुनगंटीवार

देशाचे ज्यांनी उपपंतप्रधान पद भूषविले आहे. त्या नेत्यांवर असे आरोप करणारे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे डोके फिरले आहे. म्हणून ते असे बोलत आहेत, अशी खरमरीत प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.

Jan 24, 2013, 06:49 PM IST

‘आबांची भाषा अंडरवर्ल्डची’

गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या भाषेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतलाय. ही भाषा अंडरवर्ल्डची असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलंय.

Dec 12, 2012, 04:39 PM IST

राज ठाकरेंच्या स्वागताला भाजप पदाधिकारी

चंद्रपुरातील ताडोबा दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी चक्क चंद्रपूरचे भाजप पदाधिकारी पोचले. आपल्या चंद्रपूर दौ-यात राज नागपूरहून थेट दाखल झाले ते ताडोबा जंगलात.

May 31, 2012, 01:00 PM IST

चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना काँग्रेसचा दे धक्का!!

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकित काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसणार असे दिसते आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाहीये.

Apr 16, 2012, 02:11 PM IST

राज-मुनगंटीवार भेटीने नाशिकचा गुंता सुटणार?

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला महापौर होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 13, 2012, 06:58 PM IST

मनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत

नाशिकमध्ये जनादेशाचा आदर केला जाईल असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेनेनं महापौरपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशीची चर्चा आहे.

Mar 9, 2012, 07:48 PM IST

मनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!

मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत

Mar 9, 2012, 05:44 PM IST

नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला

नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

Mar 9, 2012, 05:44 PM IST