लिव्ह इन रिलेशन म्हणजे पाप नाही - सुप्रिम कोर्ट
लिव्ह इन रिलेशनशिप हा गुन्हा किंवा पाप नाही, असं सुप्रिम कोर्टानं म्हटलंय. मात्र लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या महिलेला कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण मिळू शकत नाही. अशा महिलांच्या संरक्षणासाठी नवीन कायदे करावे किंवा कौटुंबिक हिंसाचार कायद्यात सुधारणा करावी असे निर्देश सुप्रिम कोर्टानं संसदेला दिले आहेत.
Nov 29, 2013, 05:37 PM IST‘त्या’ तरुणीचा सुप्रिम कोर्टाच्या न्यायमूर्तीनींच केला विनयभंग?
मागील वर्षी जेव्हा दिल्ली गँगरेप प्रकरणानं दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरवून सोडला होता. तेव्हा ख्रिसमसच्या रात्री दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये या वकील तरूणीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला.‘जर्नल ऑफ इंडियन लॉ अँड सोसायटी’च्या ब्लॉगमध्ये या वकील तरूणीनं हा भयंकर अनुभव मांडलाय.
Nov 12, 2013, 06:14 PM ISTफसवलेल्या दुसऱ्या पत्नीला पोटगीचा अधिकार- सुप्रिम कोर्ट
“पहिलं लग्न झालंय आणि ते न सांगता जर दुसरं लग्न केलंत, तर दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पत्नीचा दर्जा मिळून घटस्फोटानंतर तिला पोटगी मिळेल”, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रिम कोर्टानं दिलाय. हिंदू विवाह कायद्यानुसार अशा जोडप्याच्या मुलांनाही उदरनिर्वाह भत्ता मिळाला पाहिजे, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.
Oct 21, 2013, 08:56 AM ISTसरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण!
सुप्रीम कोर्टानं अपंगांना मोठा दिलासा दिलाय. अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणाची येत्या तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र तसंच सर्व राज्य सरकारांना दिलेत.
Oct 9, 2013, 08:43 AM IST‘आधार’च्या अंमलबजावणी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी
देशातल्या विविध कल्याणकारी योजनांसोबत आधार कार्डवरील प्रत्येकाची विशिष्ट संख्या इतर योजनांसोबत जोडण्याविरोधात सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ही याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांचाही समावेश आहे.
Oct 8, 2013, 10:55 AM ISTमतदारांनी नाकारलं तरी उमेदवाराचाच विजय होणार!
निवडणुकीच्या सर्व उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना असल्याचं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टानं नोंदवले आहे. मात्र, या निर्णयाने उमेदवाराला चपराक बसणार नाही. मतदारांनी नाकारलं तरी त्यांतून जास्त मतं मिळवलेला उमेदवारच विजयी ठरणार आहे.
Sep 27, 2013, 03:55 PM ISTनिवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
निवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंगवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. त्यामुळे आता मतदारांना उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यासाठी EVM मशिनमध्ये `रिजेक्ट`चं बटण द्यावे, असं सर्वोच्च न्यायालयने हा निर्णय देताना म्हटलं आहे.
Sep 27, 2013, 11:52 AM ISTललित मोदींचा गेमओव्हर!
इंडियन प्रीमियर लीग ही लोकप्रिय टूर्नामेंट सुरु करणारे ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयनं आजीवन बंदी घातली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लावण्यात आलेल्या २२ आरोपांपैकी ८ आरोपांमध्ये दोषी आढळल्यामुळं त्यांच्यावर एकमतानं ही बंदी लादण्यात आली आहे. मात्र, मोदी या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देणार आहेत.
Sep 26, 2013, 08:45 AM ISTअनिल अंबानी सीबीआय कोर्टात!
२जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी खटल्याची साक्ष द्यायला रिलायंस एडीएजीचे अध्यक्ष अनिल अंबानी सीबीआय कोर्टात पोहोचले. अंबानींच्या साक्षीसाठी आजची तारीख निश्चित करण्यात आली होती.
Aug 22, 2013, 12:00 PM ISTरतन टाटा पोहोचले सुप्रिम कोर्टात!
2 जी स्पेक्ट्र म घोटाळ्यासंबंधी सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे देखील उपस्थित होते. टाटा यांचं राडियाबरोबरील संभाषण फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, यासाठी टाटा यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
Aug 21, 2013, 03:37 PM IST२जी घोटाळा एनडीएच्या काळातलाः सिब्बल
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र ही पॉलिसी एनडीए सरकारची असल्याने त्यांनीच देशाची माफी मागावी, असे म्हणत दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी
Feb 2, 2012, 05:18 PM IST