सोने दर

सोने दरात मोठी घसरण, पुढील १ महिन्यात हा असेल दर

नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी आपला पैसा सोन्यात गुंतवला. मात्र, त्यांच्यासाठी वाईट दिवस सुरु झाले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर सोने दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. पुढील १ महिन्यात सोने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

Dec 10, 2016, 11:37 PM IST

सोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली

दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.

Nov 3, 2016, 11:00 AM IST

सोन्याच्या दरात मोठी घसरण

दसरा सणाच्या निमित्त सोनेखरेदीचा विचार असेल तर लगेच घाई करा कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीये.

Oct 6, 2016, 03:43 PM IST

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे. 

May 29, 2016, 12:58 PM IST

सोने दरात पुन्हा घसरण

सोने सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. पुन्हा एकदा सोने दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Mar 9, 2016, 03:01 PM IST

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.

Feb 23, 2016, 05:32 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात वाढ

ऐन लग्नसराईच्या मोसमात मागणी वाढल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. 

Jan 31, 2016, 04:00 PM IST

जानेवारीत सोन्याच्या किंमतीत घसरणीची शक्यता

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोने खरेदीचा विचार असेल तर त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असल्याने या महिन्यात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव २४,७४०- २५-९१४ दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

Jan 4, 2016, 01:18 PM IST

सोन्याच्या किंमतीत आठवड्याभरात ४७० रुपयांची घसरण

सोने खरेदीला जाताय तर थोडे थांबा. कारण अजून स्वस्त होणार आहे सोने. जागतिक बाजारातील मंदी आणि दागिन्यांच्या मागणीत घट राहिल्याने सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात ४७० रुपयांनी घट पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रति ग्रॅम २६ हजारांवरुन घसरुन २५ हजार ५३० वर बंद झाले. तसेच 

Dec 21, 2015, 01:14 PM IST

सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झालीये. नऊ वर्षानंतर प्रथमच रिझर्व्ह बँकेने ही वाढ केलीय. 

Dec 17, 2015, 01:04 PM IST

सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा

जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशीही सोने दरात घसरण झाली.

Dec 16, 2015, 02:21 PM IST

सोने आणखी स्वस्त होणार

सोने खरेदीसाठी निघाला आहात? तर आणखी थोडे दिवस थांबा. कारण सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घटत्या दराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत सोने २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे. 

Dec 4, 2015, 01:32 PM IST

सोन्याच्या किंमती झाल्यात कमी, खरेदीदारांसाठी खुशखबर

सोन्याच्या किंमतीत बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचे दर १६४ रुपयांनी कमी होऊन २४ हजार ८३० रुपयांवर बंद झाले. सकाळी सोन्याचे दर २५ हजार ०६५ होते. दिवसभरात सोन्याने २५ हजार १२७ रुपये इतका उच्चांकी स्तर गाठला तर २४ हजार ८१४ रुपये इतका नीचांकी स्तर गाठला. 

Dec 3, 2015, 10:03 AM IST

सलग सहाव्या दिवशी सोने दरात घसरण, महिन्यातील निच्चांक

जागतिक बाजारातील मंदी आणि सराफा बाजारातून मागणीत घट झाल्याने सलग सहाव्या दिवशी सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यातील हा सर्वात निच्चांक आहे. राजधानी दिल्लीत आज २७० रुपयांनी सोने दर खाली आला.  

Nov 4, 2015, 07:56 PM IST