स्पेन

मेंढ्यांचे लोंढे राजधानीकडे!

हिवाळ्याची चाहूल लागताच स्पेनमधील हजारो मेढ्यांनी मैदानी भागाकडे कुच केली. राजधानी माद्रिदच्या रस्त्यांवर मेंढ्यांचे लोंढे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतुकीला मेढ्यांचा अडथळा होऊ नये म्हणून वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

Oct 30, 2012, 08:11 AM IST

महिन्याला होते ५००० घोड्यांची कत्तल!

आर्थिक संकटामुळे स्पेनमध्ये दर महिन्याला सुमारे ५००० घोडे कत्तलखान्यात जातात किंवा पशूंना असेच वाऱ्यावर सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील शेतकऱ्यांकडे घोड्यांना किंवा पाळीव प्राण्यांना चारा-पाणी करण्यासाठी पैसे नसल्याने घोड्यांना कत्तलखान्यात जाण्याची वेळ आली आहे.

Jul 10, 2012, 05:52 PM IST

स्पेनच ठरलं 'युरोपिअन किंग'

इटलीचा 4-0 नं धुवा उडवत स्पॅनिश टीम सलग दुस-यांदा युरोपियन चॅम्पियन झाली. या विजयासह त्यांनी तिसऱ्यांदा युरो कप जिंकण्याची किमया साधली. फुटबॉलच्या इतिहासात तीन मेजर टायटल जिंकत स्पॅनिश टीमनं नवा इतिहास रचला आहे.

Jul 2, 2012, 10:32 AM IST

युरो कप चॅम्पियन कोण ठरणार?

‘डिफेन्डिंग चॅम्पियन्स’ स्पेन आणि टुर्नामेंटमधील ‘डार्क हॉर्स’ इटली यांच्यामध्ये युरो कपची फायनल रंगणार आहे. विजयासाठी फेव्हरिट असलेल्या स्पॅनिश टीमला इटलीच्या कडव्या आव्हानाला सामोर जाव लागणार आहे.

Jun 30, 2012, 12:44 PM IST

युरो कप : स्पेनची फायनलमध्ये धडक

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेननं पोर्तुगालवर विजय मिळवत युरो कपची फायनल गाठलीय. दोन्ही टीम निर्धारित वेळेत गोल करण्यास अपयशी ठरल्या. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रुनो अल्वेसची मिस झालेल्या पेनल्टीमुळं पोर्तुगालचा घात झाला आणि स्पेननं ४-२ नं पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक विजय मिळवला.

Jun 28, 2012, 08:38 AM IST

स्पेननं आयर्लंडला अक्षरश: चारली धूळ...

गतविजेत्या स्पेनने लीगमधील पहिल्या विजयाची नोंद केलीय. ग्रुप सीमध्ये दुबळ्या आयर्लंडवर स्पेनने ४-० ने विजय मिळवत ग्रुपमध्ये अव्वल स्थान काबिज केलंय. स्ट्रायकर फर्नांडो टोरेस स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Jun 15, 2012, 07:49 AM IST

इराणची युरोपला धमकी

इराणने जर्मनी, स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगल आणि नेडरलँड या युरोपिय देशांचं तेल रोखण्याची धमकी दिली आहे. इराणचं म्हणणं आहे, जर हे देश इराणविरुद्ध कारवाई करत राहिले तर या देशांना इराण कडून मिळणारं तेल बंद करण्यात येईल.

Feb 21, 2012, 06:13 PM IST