हक्कभंग

लेखिका 'शोभा डे' यांना हक्कभंगाची नोटीस

लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रतापसरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडला, यानुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शोभा डे यांना हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे, एका आठवड्याच्या आता डे यांना या नोटीसचं उत्तर द्यावं लागणार आहे.

Apr 12, 2015, 01:55 PM IST

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत गोंधळ, दिवस हक्कभंगाचा!

आज विधीमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र हा दिवस गोंधळात सुरू आहे. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. सावनेर तालुक्यातील वाळू उत्खननातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरुद्ध हा हक्कभंग आणलाय. 

Apr 10, 2015, 12:42 PM IST

मराठीची 'शोभा' : शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग

शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग

Apr 8, 2015, 05:17 PM IST

राणेंनी काय केलं, झाला हक्कभंग...

उद्योगमंत्री नारायण राणें यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा हक्कभंग दाखल केला आहे. नारायण राणे यांनी विधिमंडळात भाजप नेत्यांनी भूखंड लाटल्याचा आरोप केला होता.

Apr 20, 2012, 03:54 PM IST