हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेला सापत्न वागणूक

 मध्य रेल्वेचे सावत्र अपत्य अशीच हार्बर रेल्वेची ओळख आहे. कारण रेल्वेमध्ये ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध होतात, त्या सगळ्यात शेवटी हार्बरकडे पोहचतात अशी अवघड परिस्थिती आहे.

Jul 8, 2014, 07:50 AM IST

४५ मिनिटानंतर रेल्वे सुरू, मध्य-हार्बर मार्गावर तुफान गर्दी

मुंबई - मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २० मिनिटांपासून ठप्प आहे. त्यामुळे सीएसटी येथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. मोटरमन आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील वादामुळे रेल्वे ठप्प होती. ही वाहतूक ४५ मिनिटानंतर सुरू झालेय. मात्र, तुफान गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत..

Jan 10, 2014, 07:32 PM IST

हार्बर रेल्वे सेवा सुरळीत

मालगाडीचे डबे घसरल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. ही सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. कुर्ला स्थानकाजवळ मालगाडीचे तीन डबे घसरल्याने या मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.

Aug 28, 2013, 02:29 PM IST

हार्बर रेल्वे विस्कळीत, रूळाला तडे

हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. वाशी आणि मानखूर्द दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या वीस मिनिटे उशीराने धावत आहे.

Jun 28, 2013, 10:42 AM IST

हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू, गती कमी

हार्बर मार्गावरील गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी दुपारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, युद्धपातळीवर काम करण्यात आल्यानंतर हार्बरची सेवा सुरू झाली आहे.

Jun 18, 2013, 06:15 PM IST

हार्बरवर मेगाब्लॉक! नो टेन्शन, रेल्वे सुरूच

हार्बरवासीयांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिलेय. मेगाब्लॉक जरी हार्बर रेल्वेवर असला तरी पनवेल-सीएसटी आणि सीएसटी-पनवेल सेवा सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बरवरील प्रवाशांचे मेगाहाल थांबणार आहेत.

Apr 30, 2013, 04:16 PM IST

हार्बर रेल्वे खोळंबली, पत्रे उडून ओव्हरहेड वायर तुटली

ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रबाळे स्टेशनमध्ये छताचे पत्रे रेल्वे रुळांवर पडल्यानं ओव्हरहेड वायर तुटली आहे.

Mar 7, 2013, 04:38 PM IST

हार्बरची वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने

वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली तरी गाड्या उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

Mar 5, 2013, 07:53 PM IST

मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत

आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे तसंच हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे ऑफिसमधून घरी परतण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सीएसटी स्टेशनवर हजारो प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

Nov 7, 2012, 07:57 PM IST

Exclusive - रेल्वे बजेट- २०१२

केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचे हे पहिले रेल्वे बजेट आहे. आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये त्रिवेदी सर्वसामान्य प्रवाशांना खूश करतात की निराश हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्रातील सात विभागात कोण कोणत्या मागण्या आहेत. याचा हा एक्स्ल्युझिव्ह आढावा...

Mar 14, 2012, 03:52 PM IST

रेल्वेचे सावत्र अपत्य 'हार्बर रेल्वे'

१६ मार्चला रेल्वे बजेट सादर होणार असल्याने सर्व मुंबईकराचं त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. समस्यांचा रेल्वे मार्ग म्हणून हार्बर रेल्वे मार्गाची ओळख आहे. रेल्वेचे सावत्र अपत्य असल्यासारखी वागणूक हार्बर रेल्वेला आणि पर्यायाने तिथल्या रेल्वे प्रवाशांना मिळत असल्याची टीका प्रवासी संघटना करत आल्या आहेत.

Mar 11, 2012, 06:41 PM IST

'ब्लॉक' करणार मुंबईकरांना 'मेगाब्लॉक'....

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गासह सीएसटी-कुर्ला आणि वडाळा-वांद्रे स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०:१३ ते दुपारी ३: ४८ या दरम्यान हा मेगाब्लॉक असणार . त्यामुळे अप धीमा गतीच्या मार्गावरील ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्टेशन्सवर लोकल थांबणार नाहीत.

Dec 18, 2011, 05:48 AM IST