दलित अत्याचाराच्या प्रश्नावर आठवलेंचं आंदोलन
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ९ मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील नितीन आगे या तरुणाची हत्या करण्यात आली.
May 4, 2014, 07:24 PM ISTआंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!
टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Feb 12, 2014, 06:31 PM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.
Feb 12, 2014, 05:18 PM ISTखबरदार! टायर जाळताय भरा २५ कोटींचा दंड!
कुठलाही प्रश्न पेटवायचा ठरला की रस्त्यावर उतरुन आंदोलन करायचं... आंदोलन किती भडकलंय हे दाखवायला जाळपोळ करायची... आणि त्यासाठी पेटंट म्हणजे टायर जाळायचे... पण आता हे टायर जाळणं चांगलंच महागात पडणार आहे... तब्बल २५ कोटींपर्यंत दंड होणार आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांनाही ही टायर जाळणारी आंदोलनं बरीच महागात पडणार आहेत.
Feb 7, 2014, 11:43 AM ISTआयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार, फेरमुल्यांकन - सीएम
कोल्हापूरतील आयआरबीच्या टोलविरोधात रान उठलं असताना राज्य सरकारनं अखेर त्याची दखल घेतलीय. आयआरबी कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांचं फेरमुल्यांकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार असल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलं.
Feb 6, 2014, 10:05 PM ISTआता केजरीवालांच्या विरोधात आंदोलन..
अरविंद केजरीवालांनी निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आश्वासन दिलं होत. केजरीवालांनी कंत्राटी कामगारानां दिलेल आश्वासन पूर्ण न केल्यामुळे, कंत्राटी कामगारांनी केजरीवालांच्या विरोधात आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे. त्यामुळे दिल्लीतील सरकारी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
Jan 30, 2014, 06:09 PM ISTराज ठाकरेंच्या अटकेचं राज्य सरकारसमोर आव्हान
राज्यात मनसेनं छेडलेल्या टोल आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता आहे.
Jan 29, 2014, 01:36 PM ISTगरोदर महिलेला पोलिसांनी केली मदत; डॉक्टरांचं कामबंद!
एका गरोदर महिलेला लवकर उपचार मिळावे, यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याविरोधात सोलापूरमधल्या शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे १५०० रुग्णाचे आरोग्य धोक्यात आलंय.
Dec 31, 2013, 10:55 AM ISTइअर एंडला मिळणार शिळं मटण
३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरच्या खवय्ये नागरीकांना चिंतेत टाकणारी एक बातमी....कोल्हापूर महानगरपालीकेनं आधुनिक कत्तलखाना बी.ओ.टी तत्वावर उभारण्याच निर्णय घेतलाय.
Dec 27, 2013, 10:30 PM ISTअण्णांच्या उपोषणाला आशेचा एकच ‘किरण’!
अण्णांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अण्णा हजारे यांच्यासोबत किरण बेदीही येत्या शनिवारपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत.
Dec 11, 2013, 06:23 PM ISTअरविंद केजरीवालांचं, गरज सरो... वैद्य मरो!
जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत, बेमुदत उपोषण सुरू केलंय... तर दुसरीकडं आम आदमी पार्टीचा आणि पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा अजूनही विजयाचा जल्लोष सुरू आहे.
Dec 11, 2013, 06:07 PM ISTयापूर्वी १६ वेळा एकट्यानंच यशस्वी केली आंदोलनं - अण्णा
जनलोकपालसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत आजपासून (मंगळवार) पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय.
Dec 10, 2013, 10:37 PM ISTउसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.
Nov 29, 2013, 07:49 PM ISTकोल्हापुरात आजपासून टोल वसुली, आंदोलकांचा ठिय्या!
कोल्हापुरात आजपासून टोल वसुली सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. परिसरात कलम १४४लागू करण्यात आलाय.
Oct 17, 2013, 11:03 AM IST23 महाविद्यालयांची मान्यता रद्द
23 बीएएमएस महाविद्यालयांची मान्यता रद्द झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांत हलवण्यात आलेलं नाही. याचविरोधात गेल्या २४ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. त्यातल्या 5 जणांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. मात्र सरकार अजूनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
Aug 3, 2013, 01:40 PM IST