ai photos

रोप वे सुरु झाल्यावर कशी दिसेल काशी? AI Photo

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने विविध प्रयोग केले जात आहेत. एआयची मदत घेऊन लोक वर्तमान आणि भविष्यातील फोटो बनवत आहेत. रोप वे सुरु झाल्यास काशी/बनारस कसे दिसेल? असा प्रश्न एआयला विचारला. एआयने रोपवे सोबत वाराणसी म्हणजेच काशीचे सुंदर फोटो समोर आणले.काशीमध्ये देशातील पहिला अर्बन रोपवे बनतोय. त्याचे काम ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.रोपवे तयार करण्याचे काम मे 2023 मध्ये सुरु झाले. याआधीचे टप्पे आता पूर्ण होत आहेत. रोप वे झाल्यावर काशी विश्वनाथ मंदिरात जाणे भाविकांना सोपे पडणार आहे. स्टेशनहून मंदिरात जाणाऱ्या भक्तांना ट्रॅफीकची समस्या यायची. रोप वेची एकूण लांबी 3.75 किमी आहे. यात एकूण 5 स्थानके बनवली जातील. पण उतरण्यासाठी 4 स्थानके असतील. हे सर्व फोटो एआयच्या संकल्पनेवर आधारित आहेत. 

Jul 22, 2024, 02:06 PM IST

INDIA च्या सरकारमध्ये ठाकरे, सुळे थेट कॅबिनेटमध्ये असते; त्यांच्याकडे असती 'ही' मंत्रालयं

If INDIA Alliance Comes To Power Who Will Handle Which Important Ministries: देशात लोकशाही आघाडीऐवजी इंडिया आघाडीने बाजी मारली असती तर देशातील मंत्रीमंडळ नेमकं कसं असतं? कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कोणत्या मंत्र्याकडे सोपवण्यात आली असती? पाहा हे रंजक फोटो... 

 

Jun 26, 2024, 09:53 AM IST

पक्षी माणसासारखे दिसू लागले तर? पहा AI फोटो

Birds AI Photos: पक्षी आणि माणसांचं जवळचं नात आहे. कोंबडा, चिमणी, कावळा, पोपट असे अनेक पक्षी आपण दैनंदिन जिवनात पाहत असतो. पक्ष्यांचे रंग, आवाज, वागणे याबद्दल नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. माणूस आणि पक्षांमध्ये तसेच अनेक फरक आहे. त्यातील मुख्य बुद्धीमत्तेचा फरक. पण पक्षी माणसांसारखे दिसू लागले तर? प्रत्यक्षात हे शक्य नाही पण AI कडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. म्हणून आम्ही हा प्रश्न एआयला विचारला.

Jun 25, 2024, 08:48 PM IST

टीम इंडियाचं मंत्रिमंडळं असतं तर... जडेजा कृषीमंत्री! कोहली, पंतकडे 'हे' मंत्रालय; पाहा Photos

What If Indian Cricket Players Form Cabinet: भारतात क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही गोष्टींबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नवीन मंत्रीमंडळ स्थापन झालं आहे. दुसरीकडे भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप खेळत आहे. पण भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश असलेलं मंत्रीमंडळ तयार केलं तर? कोणत्या खेळाडूकडे कोणतं मंत्रालय जाईल? कोणावर कोणती जबाबदारी सोपवता येईल पाहूयात...

Jun 24, 2024, 11:09 AM IST

लगान चित्रपटात भारतीय खेळाडू असते तर? पाहा AI चे भन्नाट फोटो

पण जर लगान चित्रपटात आले खरे क्रिकेटर असते तर कसे दिसले असते. पाहा AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेले भन्नाट फोटो

 

Jun 9, 2024, 04:15 PM IST

रोहित, विराट, धवन बॉडी बिल्डर असते तर? धोनीचा तर स्वॅगच वेगळा

AI Images : देशात सध्या आयपीएलची धुम सुरु आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअममध्य प्रेक्षकांची तुफान गर्दी होतेय. पण समजा तुमचे आवडते क्रिकेटपटू बॉडी बिल्डर असते तर. एआयने भारतीय खेळाडूंचे असेच काही फोटो तयार केले आहेत. 

Apr 17, 2024, 09:40 PM IST

लय मोठा AC, आजींचं Ice Helmet, गारेगार स्कूटर अन्..; या भन्नाट कल्पना पहिल्या का?

Beat The Summer Heat Funny AI Photos: सोशल नेटवर्किंगवर या फोटोंची चांगलीच चर्चा आहे.

Apr 15, 2024, 02:59 PM IST

100 वर्षानंतर कशी दिसतील भारतातील गावं? AI ने शेअर केले फोटो

AI Indian Village:आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने लोक नवनवीन प्रयोग करत आहेत. 100 वर्षानंतर भारतातील ग्रामीण भाग कसा दिसेल? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.गाव म्हटलं की शेत आणि जुनी घरे डोळ्यासमोर येतात. पण एआयचा कल्पनाविस्तार वाखाणण्याजोगा आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, असे गावचे फोटो एआयने दाखवले आहेत.

Mar 31, 2024, 02:33 PM IST

हजारोंना घायाळ करणारी ‘ही’ तरुणी निघाली पुरुष! AI चा असा वापर पाहून डोकं पडेल सुन्न

Instagram Female Influencer Truth: 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' असं म्हटलं जातं. आजच्या इंटरनेटच्या जगात तर काय खरं आणि काय खोटं नेमकं सांगता येत नाही. हल्लीच्या तंत्रज्ञानामुळे अनेकदा समोरच्या प्रोफाइलवरी व्यक्ती खरी आहे की खोटी कळत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...

Feb 23, 2024, 03:05 PM IST

प्रसिद्ध अभिनेते रामाच्या भूमिकेत कसे दिसतील? AI फोटो आले समोर

प्रसिद्ध अभिनेते रामाच्या भूमिकेत कसे दिसतील? AI फोटो आले समोर 

Jan 20, 2024, 07:10 PM IST

100 वर्षांनंतर कशी दिसेल आपली मुंबई?

आपली मुंबई ही 100 वर्षांनंतर कशी दिसेल याची झलक AI ने दाखवली आहे. 

Jan 19, 2024, 02:05 PM IST

वाहनांना स्वेटर घातलं तर? स्कॉर्पिओ, विमानाचे फोटो पाहाच; Creativity पाहून भरेल हुडहूडी

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles: भारतात खास करुन उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. आपल्याला थंडी वाजत असेल तर सर्वात पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे स्वेटर. थंडी घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय असलेलं स्वेटर हे मानवाबरोबरच चक्क गाड्यांना वापरलं तर काय होईल? पाहूयात याच संकल्पनेवर आधारित काही खास फोटो...

 

Jan 1, 2024, 12:07 PM IST

हॅप्पी बर्थडे बापू...!

Gandhi Jayanti 2023:  भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांची आज 154 वी जयंती आहे.

Oct 2, 2023, 08:02 PM IST

'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी

आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय. 

Sep 28, 2023, 05:12 PM IST

बॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?

शाहरुख खान ते अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?

Aug 23, 2023, 10:28 PM IST