akola

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील अडचणीत, दोन मतदारसंघात नावं

भाजपचे अनेक मंत्री विविध कारणांनी अडचणीत सापडले असतानाच, आता राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. दोन मतदारसंघात नावे असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडलाय.

Jul 13, 2015, 10:39 AM IST

युवकाचं अनैसर्गिक लैंगिक शोषण, स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड

अकोल्यातील नावाजलेल्या भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि सचिवांविरोधात अनैसर्गिक बलात्काराचा गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आलाय. राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात रोजंदारी काम करणाऱ्या एका तरुणानं हा आरोप केलाय. 

Jul 7, 2015, 06:10 PM IST

पतीच्या मित्रांना शरीरसुख नाकारले, पतीने विवाहितेस पेटवले

दारुड्या पतीच्या मित्रांना शरीरसुख नाकारणाऱ्या पत्नीला पतीने मित्रांच्या मदतीने पेटवून दिल्याची घटना २९ जून रोजी घडली. किशोर काकड असे या दारुड्या नराधमाचे नाव आहे. किशोर याच्या व्यसनासाठी त्याचे मित्र पैसे देत होते. त्याचा मोबदला म्हणून पत्नीला आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगितले. 

Jul 3, 2015, 07:14 PM IST

एकनाथ खडसेंच्या पुतण्याविरोधात अटक वॉरंट

जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे दीड कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.

Jul 3, 2015, 01:33 PM IST

स्वच्छ भारत अभियान: चैतालीनं बाबांना मागितलं 'रेडीमेड' शौचालय

आज अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नया अंदुरा गावात झालेलं एक लग्न 'स्वछ भारत' मोहिमेला एका नव्या अन सकारात्मक वळणावर नेणारं ठरलंय... कारण, या लग्नात वधूनं आपल्या पित्याकडे चक्क शौचालय आंदन देण्याचा अट्टहास धरला होता. अन वधूपित्यानंही स्वच्छतेत शौचालयाचं महत्व जाणत आपल्या मुलीला थेट 'रेडीमेड' शौचालयाचं आंदन देत एक इतिहास घडविलाय. 

May 15, 2015, 09:30 PM IST

अकोटमध्ये पिसाळलेल्या माकडाचा उच्छाद

अकोटमध्ये पिसाळलेल्या माकडाचा उच्छाद

May 15, 2015, 02:36 PM IST

मुख्याध्यापिकेसह सहा महिला शिक्षकांवर लैंगिक अत्याचार

अकोल्यातल्या 'इकरा उर्दू हायस्कूल'च्या संस्थाचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

May 8, 2015, 06:33 PM IST

अकोल्यात खाकी वर्दीतील गुंडगिरी

खाकी वर्दीतल्या गुंडगिरीचा पुन्हा प्रत्यय आलाय. अकोला जिल्ह्यात पोलिसांनी निरपराध गावकऱ्यांना मारहाण तर केलीये. शिवाय दुस-या एका घटनेत पोलीस अधिक्षकांनी 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीला शिवीगाळ करत त्याचा कॅमेराही हिसकावून घेतला. 

Apr 22, 2015, 11:44 PM IST