3
3
टीम इंडियाचा उप कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी संकेत दिले की, शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. धवन काही पर्सनल कारणाने ऑस्ट्रेलिया विरूद्धचे पहिले तीन सामने खेळणार नाहीये.
काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने यांनी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या करिअरमध्ये सलमान खानचे खूप मोठे योगदान असल्याचे आपण जाणतोच. खरंतर सलमान खाननेच कतरिनाला बॉलिवूडमध्ये रिलॉन्च केले होते.
पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते.
राज्याचा दारूबंदीचा कायदा तयार आहे. शासनाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कायदा तयार केला आहे.
एकाच नावाने अनेक ड्रायविंग लायसेंस बनवण्यावर आता बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. नव्या ड्रायविंग लायसेंस बनवण्यासाठी किंवा जुनं रिनिव्ह करण्यासाठी आधार कार्ड देणं आता आवश्यक असणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेचा 2017-18 या वर्षीचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी, 29 मार्चला स्थायी समिती सभेत सादर केला जाणार आहे. दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार असून यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटी रूपयांनी कमी असणार आहे.
देशातील सर्वात युवा खासदार आणि इंडियन नॅशनल लोकदल पक्षाचे नेता नेता दुष्यंत चौटाला यांचा मंगळवारी मेघना अहलावत हिच्यासोबत साखरपुडा झाला. गुडगावमधील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला.
पुणे - ग्रामीण पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे हा ठार झाला आहे. या कारवाईत त्याचा एक साथीदार धनंजय शिंदे देखील ठार झाला आहे. तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो फरार होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक वनडे सामन्याता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय. अखेरची वनडे जिंकत मालिका जिंकण्याच्या इराद्याने आज टीम इंडिया मैदानात उतरेल तर दुसरीकडे भारतात वनडे मालिका जिंकण्यास न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे.