चेन्नई : टीम इंडियाचा उप कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी संकेत दिले की, शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. धवन काही पर्सनल कारणाने ऑस्ट्रेलिया विरूद्धचे पहिले तीन सामने खेळणार नाहीये.
धवनला त्याच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे तो १७ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरिजमधील पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळणार नाही.
रोहित म्हणाला की, ‘आमची संपूर्ण टीम मजबूत आहे. नक्कीच शिखर कमतरता भासेल. तो शानदार फॉर्ममध्ये होता आणि टीमच्या नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली. मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आमच्याकडे काही खेळाडू आहेत. अजिंक्य त्यातील एक आहे. वेस्टइंडिजमध्ये रहाणेने चांगलं प्रदर्शन केलं होत. तसंच त्याअल मॅन ऑफ द सीरिजही देण्यात आलं होतं’.
रोहित म्हणाला की, रहाणे कोणत्याही वेळी ही भूमिका साकारू शकतो. टीममध्ये असे काही खेळाडू आहेत, जे ही भूमिका चांगली साकारू शकतात.