campaign

‘दारु पिऊन गाडी चालवू नका’; ‘झी २४ तास’ची मोहीम

‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहीम रोजच राबवली जाते पण, नवीन वर्षाच्या या सप्ताहात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यानं दरवर्षी मुंबई ट्राफिक पोलीस या सप्ताहात ‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहिम रात्री उशीरापर्यंत राबवतात. त्यामुळे केवळ या आठवड्य़ात नाही तर ‘कधीही दारु पिऊन गाडी चालवू नका’ असं आवाहन झी मीडिया मुंबईकरांना करतेय.

Dec 30, 2013, 10:24 AM IST

सजग, विवेकी, निर्भय होवू!- विद्यार्थ्यांची मोहीम

पुण्यातल्या विविध कॉलेजचे ४० विद्यार्थी एकत्र येऊन सजग, विवेकी, निर्भय होवू! ही मोहीम एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलीय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली देत अंधश्रद्धेविरुद्ध समाजाला जागरुक करण्यासाठी हे ४० विद्यार्थी पुढं आले आहेत.

Sep 25, 2013, 12:57 PM IST

राहुल गांधींचा नारा- `तीन-चार रोटी खाइए और कांग्रेस की सरकार लाइए`

राजस्थानातील उदयपूर येथील सलूंबर या आदिवासी शेतकरी मोर्चात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराचा आरंभ केला. काँग्रेसला मतं देण्याबद्दल राहुल गांधींनी जनतेला आवाहन केलं.

Sep 11, 2013, 06:32 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार, दंगलीतल्या आरोपींचा संचार!

सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं दंगलीतल्या आरोपींचा आधार घेतल्याचं दिसतंय. २००९ मध्ये सांगलीत दंगल भडकावणा-या आरोपींच्या प्रचारसभेस चक्क गृहमंत्र्यांनीच हजेरी लावत लांबलचक भाषणही ठोकलं तर दुसरीकडे मिरजेत दंगलीच्या आरोपीलाच सोबत घेवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या.

Jul 1, 2013, 05:31 PM IST

गृहमंत्री आर. आर. पाटील करणार गुन्हेगारांचा प्रचार?

सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीने गोची केली आहे. आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरविण्यात आले, अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याने आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे.

Jun 21, 2013, 11:23 AM IST

अविनाश बागवेंना पोलिसांची धक्काबुक्की

पुण्यात काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार केली आहे. कासेवाडीतल्या प्रभाग क्र.६० मध्ये हा प्रकार घडला. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत.

Feb 16, 2012, 01:38 PM IST

स्पर्धा माडाच्या झाडावर चढायची !

माडावर चढणं तुम्हाला कठीण वाटत असेल, पण आता ते सहजपणे शक्य आहे. कोकण कृषी विद्यापीठानं माडावर चढण्याकरता खास यंत्र विकसीत केलं आहे. या यंत्राच्या प्रसारासाठी त्यांनी माडावर चढण्याची स्पर्धा आयोजित केली होती.

Jan 28, 2012, 10:05 AM IST

मुंबईत स्टार प्रचारकांची मांदियाळी

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे.

Jan 14, 2012, 04:26 PM IST