candidate

विधानसभेची लहर, उमेदवारांनी केला कहर

विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार आता तयारीला लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडेही वापरले जातायत. वरळीतही राष्ट्रवादी आणि मनसेनं मतदारांना जवळ करण्यासाठी असेच काही फंडे वापरलेत.

Aug 18, 2014, 08:23 PM IST

भाजप पाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणी सुरू

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीपाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणीसाठी नागपूरात बैठक झाली. यासाठी दिल्लीहून पर्यवक्षेक आले होते. नेता पुत्र आपल्याला उमेदवार म्हणून चालणार नाहीत असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलं. त्यामुळं आपला उमेदवार इम्पोर्ट केला जाणार नाही, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. 

Jul 16, 2014, 10:08 PM IST

मुंडे परिवाराविरोधात राष्ट्रवादीची उमेदवारी नाही - शरद पवार

बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

Jun 22, 2014, 10:14 AM IST

बीड पोटनिवडणुकीत मुंडेविरोधात उमेदवार नाही - पवार

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

Jun 21, 2014, 10:54 PM IST

पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा - राष्ट्रवादी कार्यकर्ते

राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Jun 6, 2014, 07:49 PM IST

दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र; भाजपचा जोर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता केवळ पाच महिने उरले असताना राज्यात महायुती कुणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवणार? असा प्रश्न निर्माण झालाय.

May 27, 2014, 06:14 PM IST

लोकसभा पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक

मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.

May 20, 2014, 09:26 AM IST

पंतप्रधानपदाचा विचारही माझ्यासाठी महापाप - राजनाथ

भाजपच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर आरुढ होतील, असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय.

Apr 30, 2014, 11:04 PM IST

पुण्यात दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, नाशिकमध्येही घोळ

पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.

Apr 18, 2014, 05:48 PM IST

पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य नव्या मतदारांच्या हाती

नव्या दमाचे ७३ हजार मतदार ठरवणार आहेत, पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य. पुणे लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहेत. या यादीमध्ये लोकसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या म्हणजेच १८ ते २२ वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल ७३ हजार ३४२ इतकी आहे.

Apr 16, 2014, 09:03 AM IST

औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?

औरंगाबादमधील प्रचार आता शिगेला पोहचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेत. मात्र मनसे कार्यकर्ते मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. अजूनही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलाय.

Apr 8, 2014, 07:48 PM IST

भाजपकडून जास्तच जास्त `आयारामां`ना उमेदवारी

भाजपकडून जास्तच जास्त आयारामांना उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे. मात्र पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये याबाबतीत अस्वस्थता वाढतांना दिसून येत आहे.

Mar 31, 2014, 10:03 PM IST