cm yogi adityanath

उत्तर प्रदेशच्या विभाजनाला योगींचा नकार

उत्तर प्रदेशच्या विभाजनाला नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट नकार दिला आहे. हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्य़नाथांनी हे मत मांडलंय. स्वतः ज्या गोरखपूरचे आहेत तेथूनच पूर्वांचल नावाचं स्वतंत्र राज्य करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. शिवाय छोटी राज्य बनवणे ही भाजपची राष्ट्रीय भूमिकाही आहेच असं असूनही योगी आदित्य नाथ मात्र या मागणीच्या विरोधात आहे.

Apr 8, 2017, 11:05 PM IST

राम मंदिराच्या मुद्यावर उमा भारतींची गर्जना

आयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मुद्द्याला केंद्रीय जल संसाधन मंत्री उमा भारती यांनी हवा दिली.

Apr 8, 2017, 10:54 PM IST

बिहारमध्येही योगी आदित्यनाथांची जादू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव बिहारमधील एका गावाला देण्यात आलेय. पूर्णिया जिल्ह्यातील कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्य़ा केलाबरी फुलवरिया या गावाला त्यांचे नाव देण्यात आलेय.,

Apr 7, 2017, 10:38 AM IST

गोमांसच्या मुद्द्यावर ओवैसींची भाजपवर टीका

उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्यात येत आहे. राज्यात सुरु असलेल्या या कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. याला राजकीय रंग दिला जात आहे. खासदार असदुद्दीन ओवैसींनी या मुद्द्यावर भाजपवर टीका केली आहे.

Apr 1, 2017, 05:49 PM IST

मोदी आणि योगींवर रामगोपाल यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट

सिनेदिग्दर्शक आणि निर्माते रामगोपाल वर्मा आपल्या विधानांमुळे नेहमी वादात अडकता. यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ट्विट केलं आहे. रामगोपाल वर्मा यांनी पंतप्रधान मोदींची तुलना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केली आहे.

Mar 26, 2017, 01:30 PM IST

अखिलेश यादव यांचं योगी सरकारवर पहिलं टीकास्त्र

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 2022 च्या निवडणुकीत समाजवादी पक्ष सत्तेत पुन्हा येईल असं म्हटलं आहे. सत्तेत आल्यानंतर गंगाजलने मुख्यमंत्री आवास धुवून प्रवेश करेल असं देखील त्यांनी म्हटलं.

Mar 25, 2017, 04:02 PM IST

मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी पहिल्यांदा गोरखपूरमध्ये जाणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. २६ मार्चला गोरखपूरमध्ये योगीराज बाबा गंभीरनाथ यांच्या पुण्यतिथीच्या समारोहात ते सहभागी होणार आहेत. गोरखनाथ मंदिरात सकाळी ११ वाजता हा समारोह सुरु होणार आहे.

Mar 25, 2017, 10:36 AM IST

मुलायम सिंह यांचा मुलगा आणि सून योगी आदित्यनाथांच्या भेटीला

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादव आणि सून अपर्णा यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊला पोहोचले.

Mar 24, 2017, 10:44 AM IST

जेव्हा अचानक कार्यालयाबाहेर झाडू मारु लागले योगींचे हे मंत्री

उत्तर प्रदेशचे नवे मंत्री उपेंद्र तिवारी अचानक चर्चेत आले आहेत. तिवारी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. विधानसभेतील त्यांच्या कार्यालया बाहेर झाडू मारतांना त्यांचा हा व्हि़डिओ व्हायरल होत आहे.

Mar 23, 2017, 02:02 PM IST

पाहा मुलायम यांनी मोदींच्या कानात काय म्हटलं ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथ ग्रहण समारोहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट झाली तेव्हा मुलायम सिंह यांनी मोदींच्या कानात काहीतरी म्हटलं. त्यानंतर यावर चर्चा रंगू लागल्या.

Mar 23, 2017, 01:43 PM IST

मुख्यमंत्री बनताच योगींनी घेतले ५ मोठे निर्णय

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर लोकांसमोर पक्षाचा आणि सरकारचा अजेंडा ठेवला आहे. कमीत कमी दिवसांमध्ये योगी सरकारने जे मोठे निर्णय घेतले आहेत त्यावरुन पुढे काय होणार याचे संकेत मिळू लागले आहेत.

Mar 23, 2017, 01:05 PM IST

नवाज शरीफ यांच्यासमोर गायत्री मंत्र म्हणणाऱ्या पाक तरूणीला आवडतात योगी आदित्यनाथ

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासमोर होळीच्या कार्यक्रमात गायत्री मंत्र म्हणून प्रकाश झोतात आलेली गायिका नरोदा मालिनी यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आवडत असल्याचे स्वतः नरोदा यांनी म्हटले आहे. 

Mar 22, 2017, 08:23 PM IST

मोदींच्या रस्त्यावर योगी, गोरखपूरमध्ये मिनी मुख्यमंत्री कार्यालय

यूपीचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रस्त्यावर चालतांना दिसत आहेत. एकीकडे ते सबका साथ सबका विकासची गोष्ट बोलत आहेत तर दुसरीकडे ते गोरखपूरमध्ये मिनी सीएमओ बनवण्याची तयारी करत आहेत. पण अजून अधिकृतरित्या याची घोषणा झालेली नाही.

Mar 20, 2017, 02:18 PM IST

मुख्यमंत्री बनताच योगींनी केल्या ५ मोठ्या घोषणा

उत्तर प्रदेशात भाजप सरकारकडून लोकांची अपेक्षा फार वाढली आहे. येत्या २ वर्षात योगी कसं काम करतात यावर २ वर्षात येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं भवितव्य ठरणार आहे. निवडणुकीत भाजपने मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सरकार येताच पहिल्या २४ तासात कॅबिनेट बैठकीत हे शेतकरी कर्जमाफी आणि कत्तलखाने बंद करु असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले होते. पण मुख्यमंत्री होताच योगींनी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Mar 20, 2017, 12:07 PM IST