gas cylinder

पुन्हा पेट्रोल, डिझेल, गॅस होणार महाग?

सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागण्याची चिन्ह आहेत. ऑईल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं पेट्रोल दरवाढीचं संकट अधिकच गडद झालंय.

May 23, 2012, 12:56 PM IST

अजितदादांची २ टक्के पिछेहाट!

बजेटमधील गॅस दरवाढ 2 टक्के मागे घेण्याची घोषणा अजित पवार यांनी विधान परिषदेत केलीय. 2012-13 चे बजेट सादर करताना अर्थमंत्री अजित पवारांनी घरगुती गॅसवर 5 टक्क्यांचा अतिरिक्त कर लावल्यानंतर जनतेत नाराजी पसरली होती.

Mar 29, 2012, 06:16 PM IST

दादांचे गॅस दरवाढीचे पाऊल मागे

स्वयंपाकाच्या गॅसवर केलेली पाच टक्के दरवाढ मागे घेण्यासाठी दबाव वाढल्यानं अर्थमंत्री अजित पवार तसा निर्णय घेण्याची शक्यता दुणावली आहे. दरम्यान विरोधक आणि सत्ताधा-यांच्या विरोधामुळे गॅसदरवाढ मागे घेण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. दरवाढीबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे पवार यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगिरले.

Mar 27, 2012, 04:51 PM IST

सर्वपक्षीय दबाव, अजित पवार गॅसवर

घरगुती गॅस प्रकरणावरुन अर्थमंत्री अजित पवार यांची कोंडी झाली आहे. आधी काँग्रेसने विरोध दर्शविल्यानंतर राष्ट्रवादीने सावध खेळी करण्याचा डाव रचला. मात्र, विरोधकांनी गॅस वाढीविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यात राष्ट्रवादीने उडी घेतली. काँग्रेसची धार कमी करण्यासाठी राष्ट्रवादीने विरोध करण्याचा डाव केल्याचे सांगितले तरी वाढता सर्वपक्षीय दबावामुळे अजित पवार गॅसवर गेले आहेत.

Mar 27, 2012, 12:24 PM IST