kidnap

लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं हॉटेलमधून अपहरण

लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं अपहरण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात शस्त्रधारी लोकांनी त्रिपोलीतील एका हॉटेलमधून पंतप्रधानांचं अपहरण केलं. अली झिदान नुकतेच लिबियाच्या पंतप्रधानपदी निवडले गेले होते.

Oct 10, 2013, 11:20 AM IST

अपहरण केलेल्या बिपीनचा मृतदेह सापडला

नाशिकमध्ये अपहरण झालेल्या बिपीन बाफनाचा मृतदेह अखेर सापडलाय. निफाड रस्त्यावर विंचूर गवळी शिवारात त्याचा मृतदेह सापडलाय. एक कोटीच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.

Jun 14, 2013, 08:55 PM IST

मुलीचं अपहरण आणि बलात्कार करून MMS बनवला!

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंडका भागातील एका २१ वर्षीय मुलीचं अपहरण करून मुलाने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

Jun 6, 2013, 04:45 PM IST

अपहरण झालेल्या सपनाचा नरबळीच!

गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील ८ आरोपींनी दिली आहे.

May 29, 2013, 08:33 PM IST

आदिवासी मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात खरीवली इथं एका चौदा वर्षीय आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

Jan 31, 2013, 12:36 PM IST

अपहरण केलेल्या सरपंचांची हत्या

इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या सरपंचाचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला.

May 10, 2012, 09:21 AM IST

नक्षलवाद्यांनी केलं सरपंचाचं अपहरण

गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र अजून त्यांचा तपास लागलेला नाही.

May 9, 2012, 07:45 PM IST

ओडिशात माओवाद्यांकडून आमदाराचे अपहरण

ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदाराचे माओवाद्यांनी आज अपहरण केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुन्हा माओवाद्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. याआधी परदेशी पर्यटकांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले आहे.

Mar 24, 2012, 10:58 AM IST

माओवाद्यांनी केले पर्यटकांचे अपहरण

ओडिशातील गंजम जिल्ह्यातून अपहरण माओवाद्यांनी इटलीच्या दोन पर्यटकांचे अपहरण केले आहे. त्यामुळे याचा पर्यटकांनी धसका घेतला आहे.

Mar 19, 2012, 08:59 AM IST

कोल्हापूर : मुलीच्या अपहरणाचा शोध नाही

कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातल्या कोरोचीमधून एका दोन वर्षाच्या मुलीचं अपहरण होऊनही अद्याप शोध लागलेला नाही. विशेष म्हणजे अपहरण कुणी केलं हे माहीत असूनही पोलीस हतबल असल्याचे दिसून येत आहे.

Feb 28, 2012, 03:38 PM IST

पत्नीला धडा शिकविण्यासाठी मुलाचे अपहरण

पत्नीला धडा शिकवण्यासाठी आपल्याचा मुलाच्या अपहरणाचा बनाव नरेशच्या अंगलट आला. त्यामुळं त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.

Feb 22, 2012, 01:10 PM IST

मुलाला केलं 'किडनॅप', पोलिसांनी केलं 'ट्रॅप'

१२ वर्षांचा मुलाचं अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. २३ जानेवारीला ‘एरेक फर्नांडिस’ या शाळकरी मुलाचं अपहरण अगदी फिल्मी स्टाईलमध्ये करण्यात आलं होतं.

Jan 27, 2012, 11:34 PM IST

देव तारी त्याला कोण मारी

'देव तारी त्याला कोण मारी' याचा अनुभव पुण्यातल्या एका शाळकरी विद्यार्थ्याला आलाय. य़ा शाळकरी मुलाचं परिचयातल्या एका तरुणानं खंडणीसाठी अपहरण केलं. त्याला रुमालानं फाशीही देण्यात आली. तरीही तो मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावलाय.

Dec 17, 2011, 04:37 PM IST

सरपंच किडनॅप !

लवासा सिटीतील दासवे गावचे सरपंच शंकर धेंडले यांचं अपहरण करून चोरट्यांनी ४७ लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील धायरी भागात राहणाऱ्या धेंडले यांचं पाच चोरट्यांनी अपहरण केलं त्यानंतर त्यांना दूरवर नेऊन मारहाण करण्यात आली.

Nov 1, 2011, 01:00 PM IST