mahad bridge accident

महाड पुलाचे काम रखडल्याने गडकरींनी व्यक्त केली दिलगिरी

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली. हे काम रखडल्यानं रायगडकरांना त्रास झाल्याबददल दिलगिरी व्यक्त केली. त्याचवेळी कामाची गती आता वाढल्यानं समाधान व्यक्त केलं.

Mar 3, 2017, 06:05 PM IST

सावित्री नदी पुलाचे बांधकाम जून पूर्वी पूर्ण : गडकरी

रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील अपघातग्रस्त पुलाच्या शेजारीच नवीन पूल बांधण्याचे काम युदधपातळीवर सुरू आहे. हे काम येत्या जून पूर्वी पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Mar 3, 2017, 06:00 PM IST

महाड पूल दुर्घटना : बेपत्ता एसटीचे सांगाडे सापडले

महाडमधील सावित्री पूल अपघातात वाहून गेलेल्या  राजापूर -बोरीवली एसटी बसचे अवशेष अखेर मिळालेत. नेव्हीच्या सर्च ऑपरेशनला यश आलेय. राजापूर -बोरीवली एसटीची झालेली दशा.

Aug 11, 2016, 06:52 PM IST

महाड पूल दुर्घटना : बेपत्ता नागरिक सापडले नाही तर मृत घोषित करणार : राज्य सरकार

महाड दुर्घटनेत दोन महिन्यांत बेपत्ता नागरिक अथवा त्यांचे मृतदेह सापडले नाहीत, तर त्यांना मृत घोषित करून जाहीर झालेली मदत कुटुंबियांना देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Aug 10, 2016, 08:14 PM IST

महाड दुर्घटनेचे २२ मृतदेह हाती

महाड दुर्घटनेचे २२ मृतदेह हाती

Aug 6, 2016, 02:44 PM IST

महाड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या वाहनांचे अवशेष सापडले

महाड दुर्घटनेत  बेपत्ता झालेल्या वाहनांचे अवशेष सापडले

Aug 5, 2016, 05:23 PM IST

महाड पूल दुर्घटनेत ४२ जण बेपत्ता, १२ मृतदेह सापडलेत

महाड दुर्घटनेत एकूण ४२ जण बेपत्ता आहेत. यापैकी १२ मृतदेह हाती सापडलेत आहेत. दुसऱ्या दिवशी हे मृतदेह सापडलेत. 

Aug 4, 2016, 09:21 PM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, वारसाला नोकरी

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. दोन्ही एसटीतील २२ प्रवासी बेपत्ता आहेत. यापैकी काहींची मृतदेह हाती लागलेत. एसटीतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत किंवा वारसाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

Aug 4, 2016, 08:12 PM IST

महाड पूल दुर्घटना : सावित्री नदीत दोन एसटीसह ७ खासगी वाहने गेली वाहून

मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त लोक गायब असल्याचे वृत्त आहे. याच नदीत एसटी महामंडळाच्या दोन बसेस आणि सात खासगी वाहनं वाहून गेली आहेत.

Aug 4, 2016, 07:00 PM IST

महाड पूर दुर्घटना : राज ठाकरे यांची जहाल प्रतिक्रीया

महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालंय. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटीशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केला आहे.

Aug 4, 2016, 06:43 PM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीसह अन्य खासगी वाहनातील हे आहेत बेपत्ता प्रवासी

मुंबई गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता लोकांची नावे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. एसटीतील २२ आणि खासगी वाहनातील अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.

Aug 4, 2016, 12:00 AM IST

महाड पूल दुर्घटना : दिवसभर शोधकार्य, हाती काहीही नाही

 महाड पूल दुर्घटनेच्या मदतकार्यात अंधाराचा खंड पडला. NDRF आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या मदतीने उद्या पहाटेपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे.  

Aug 3, 2016, 11:07 PM IST

विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता

विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. 

Aug 3, 2016, 10:00 PM IST