maharashtra politics crisis

राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?

Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2023, 11:09 AM IST

Shivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय

Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. 

Jun 2, 2023, 02:30 PM IST

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

 Maharashtra Politics News :  कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 

May 30, 2023, 03:42 PM IST

राजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा

 Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे. 

May 17, 2023, 07:10 AM IST

Raj Thackeray On Supreme Court Verdict: निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "हे सगळं कन्फ्युजींग..."

Raj Thackeray On Supreme Court Verdict: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाचाही उल्लेख केला आहे.

May 12, 2023, 01:22 PM IST

12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर

Maharashtra Governor Nominated MLA : राज्यातील 12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दीड महिन्यानंतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही.

May 12, 2023, 11:28 AM IST

Ajit Pawar : ...तर विधानसभा अध्यक्षांनीच 16 आमदारांना अपात्र केले असते; अजित पवार नाना पटोलेंविषयी काय म्हणाले? वाचा

Maharashtra MLA Disqualification : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेचे अजित पवार हे काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निकालानंतर त्यांनी याबाबत मौन बाळगलं होतं. त्यानंतर पुण्यात माध्यमांसोबत बोलताना अजित पवार यांनी निकालावर भाष्य केले आहे.

 

May 12, 2023, 10:28 AM IST

Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी

Maharashtra Political Crisis  : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे.  ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही. 

May 10, 2023, 10:58 AM IST

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !

Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

May 5, 2023, 11:43 AM IST

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली. 

May 5, 2023, 09:18 AM IST

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय  काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. 

Apr 5, 2023, 12:47 PM IST

Sanjay Raut Death Threat: कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही - देवेंद्र फडणवीस

MP Sanjay Raut Death Threat: महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असला तरी कारवाई होईल. संपूर्ण तपास केला जाईल. आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Apr 1, 2023, 01:12 PM IST

Maharashtra political crisis: "मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच ठाकरेंचं सरकार पाडलं"

Thackeray vs Shinde : मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार पाडलं. बेईमानीचं बक्षीस म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं गेलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केलाय.

 

Mar 16, 2023, 04:59 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर  शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.  

Mar 10, 2023, 11:34 AM IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप

Ajit Pawar on corruption :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.

Mar 10, 2023, 08:19 AM IST