maratha morcha

शिवसेनेचा उशीराचा माफीनामा !

लाखोंच्या संख्येनं सुरू असलेले मराठा मोर्चे आताच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले तरी शिवसेनेच्या विरोधात त्यांचा फारसा राग नव्हता आणि त्यामुळे इतरांना कुणाला तोटा झाला असता तरी शिवसेनेला काहीप्रमाणात का होईना फायदाच झाला असता.... मात्र 'सामना'मध्ये मराठा मोर्चाविषयी छापण्यात आलेल्या कार्टूनमुळे एकदम चित्रच पालटलं आणि शिवसेनेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली...

Oct 3, 2016, 07:22 PM IST

मुख्यमंत्री-शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरून खलबतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.

Oct 2, 2016, 10:30 PM IST

'मुका मोर्चा'वरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार 'प्रहार'

राज्यात मराठा आरक्षणाबाबत निघणारे मराठे मोर्चे आणि शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या गोटात वादळ उठले. मात्र, हे वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. विरोधकांनी शिवसेनेला खंडीत पकडण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार 'प्रहार' केलाय.

Sep 29, 2016, 09:52 AM IST

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेत राजीनामा सत्र

शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामनाचे अंक पेटवण्यात आले, उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीची मागणी होत आहे. 

Sep 27, 2016, 10:17 PM IST

सांगलीत मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण

मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 

Sep 27, 2016, 09:37 AM IST

मराठा क्रांती मोर्चाचं वादळ नंदूरबारमध्ये

मराठा क्रांती मोर्चाच वादळ नंदुरबार जिल्ह्या देखील अनुभवत आहे. आदिवासीबहुल या जिल्ह्यात क्रांतीमोर्चा निमित्त मराठा समाजाची ताकद दिसून आली. 

Sep 26, 2016, 09:28 PM IST

मराठा मोर्चाबाबत राज्य सरकारचं एक पाऊल पुढे

 मराठा मोर्चांबाबत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. जिल्हा पातळीवर राज्य सरकार मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करणार आहे.

Sep 26, 2016, 07:05 PM IST

मराठा मोर्चाबाबत 'सामना'त आक्षेपार्ह व्यंगचित्र, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं

सामना वर्तमानपत्रात मराठा समजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले.

Sep 26, 2016, 06:11 PM IST

यवतमाळ आणि वाशिममध्ये मराठा मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशीम येथे मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. मोठ्या संख्येने मराठा बांधव वाशीम येथील कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावर एकत्रित झाले होते. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यवतमाळ वाशीमच्या खासदार भावना गवळी सुद्धा या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावरून शिवाजी चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौकहून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sep 25, 2016, 03:53 PM IST