marathi news today

IRCTC ला एका दुकानदाराने काढले मूर्खात; साइट हॅक करून विकली लाखोंची तिकिटे

IRCTC website Hacked: आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे. 

Aug 17, 2023, 05:17 PM IST

देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

Shasan Aaplya Daari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल काही सल्ले दिले. तसंच लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली.  

Aug 17, 2023, 03:22 PM IST

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 

Aug 17, 2023, 09:53 AM IST

पाच मुलींनंतर मुलगा झाला, पण आनंद क्षणभरच टिकला; जन्माच्या दोन दिवसांतच...

Newborn Baby Stolen From Hospita: रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे, तर पोलीस युद्धपातळीवर बाळाचा तपास करत आहेत. 

Aug 16, 2023, 05:43 PM IST

'वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्हाला ग्रँड मास्टर म्हणतात'

आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात असं म्हणज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. 

Aug 16, 2023, 03:02 PM IST

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी, मुंबईत नोकरी आणि महिन्याला 54 हजार पगार

TMC Recruitment: खारघरच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रिसर्च नर्स/ क्लिनिकल नर्सची 2 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी नर्सिंग / जीएनएममधे डिप्लोमा केलेला असावा. 

Aug 14, 2023, 06:37 PM IST

नेस्लेच्या 'ब्रेक अँड बेक'मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

Nestle: नेस्ले कंपनी जगभरातील 188 देशांमध्ये उत्पादने विकते. ते यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) सोबत काम करत आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. 

Aug 14, 2023, 04:37 PM IST

टोमॅटोचे दर किलोमागे निम्म्याहून घसरले, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Tomato Rates: टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.

Aug 14, 2023, 12:53 PM IST

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पतीसोबत उभारली 8 हजार कोटींची कंपनी, कोण आहे उपासना?

Upasana Taku Success Story: उपासना टाकू पूर्व अमेरिकेत राहात होत्या. पण 2008 मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या आणि त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं. उपासना टाकू यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.

Aug 14, 2023, 12:07 PM IST

ताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा; वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले, आजीचा 'असा' झाला मृत्यू

Mumbai Crime: ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते

Aug 14, 2023, 11:10 AM IST

माणसाला कमी वयात का मृत्यू का येतो? गरुड पुराणात दिलंय उत्तर

गरुड पुराणात जन्म आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. माणूस अल्पायुषी होता असे आपण म्हणतो पण गरुड पुराणात त्याची 5 कारणे दिली आहे.

Aug 13, 2023, 02:42 PM IST

कळवा रुग्णालयात नक्की काय झालं? वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितली घडलेली सत्य परिस्थिती

Kalawa Hospital Death: रुग्णालयात 500 बेडवर 600 रुग्ण आहेत. इथे येणारी माणसं गरीब असतात, कोणी श्रीमंत येत नाहीत. काही लोकं अत्यावस्थ अवस्थेत येतात. पण आम्ही दाखल करुन घेतो. आमच्याकडे 125 मेडीकल टिचर्स आणि 150 रेसिडंट डॉक्टर असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Aug 13, 2023, 02:26 PM IST

अरे बापरे! व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात 'इतक्या' तक्रारी

यातील 53 तक्रारी ऑटो रिक्षा आणि 6 तक्रारी टॅक्सी चालकांविरोधात आहेत. योग्य कारण न देता अधिक भाडे आकारण्याच्या 45 तक्रारी आहेत. मीटरपेक्षा जास्त भाडे आकारण्याच्या 7 तक्रारी आहेत. दुर्व्यवहाराच्या 2 तक्रारी आहेत. यानंतर 54 लायसन्स धारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर काहींचे 15 दिवसांसाठी लायसन्स रद्द केले.

Aug 13, 2023, 01:07 PM IST

Flipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

Flipkart Users Problem: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अनेक ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी या तक्रारी फ्लिपकार्टला पाठवल्या पण दिलासा न मिळाल्याने त्यांनी आता ट्विटरवर तक्रारी लिहिल्या आहेत. 

Aug 13, 2023, 10:01 AM IST

Sridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?

Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे. 

Aug 13, 2023, 09:00 AM IST