marathi news

गरम पाण्याचा पाईप फुटल्याने चौघांचा मृत्यू तर 70 जखमी; मॉस्कोत विचित्र अपघात

Moscow Shopping Mall : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पाण्याचा पाइप फुटल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गरम पाण्याचा पाइप फुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघाता चार जणांना जीव गमवावा लागला आहे.

Jul 23, 2023, 11:00 AM IST

VIDEO : अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून फोडला टोल नाका; समृद्धी महामार्गावरील प्रकार

Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरुन परतत असतना नाशिकमध्ये हा सगळा धक्कादायक ्प्रकार घडला आहे. मध्यरात्री आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत टोल नाक्याची तोडफोड केली आहे.

Jul 23, 2023, 10:02 AM IST

सरकारी रुग्णालयात गुदमरुन आठ रुग्णांचा मृत्यू; ऑक्सिजनअभावी जीव गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

Andhra Government Hospital : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Jul 23, 2023, 09:17 AM IST

Khappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने 'खप्पर योग'!अधिक मासात 'या' 3 राशींचं चमकणार नशीब

Khappar Yog : अधिकमासाला 18 जुलैला सुरु झाला असून या महिन्यात शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय खतरनाक असा खप्पर योग जुळून आला आहे. या अशुभ योगामुळे काही राशींवर संकट कोसळणार आहे. मात्र 3 राशींच्या नशिबात अपार धनलाभाचे योग आहेत. 

Jul 23, 2023, 09:13 AM IST

इरसालवाडीतील 78 जण अद्यापही बेपत्ता; संध्याकाळी शोधकार्य थांबवण्याची शक्यता

Irshalwadi landslide : रायगडमधील भूस्खलनात संपूर्ण इरसालवाडी गाडली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यातून आतापर्यंत 27 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 78 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

Jul 23, 2023, 08:24 AM IST

Nashik News: वीकेंडला हरिहर किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करताय? सो सॉरी... आधी ही बातमी वाचा!

Harihar Fort, Dugarwadi Waterfall: वीकेंडला हरिहरगड (Harihar Fort) तसेच दुगारवाडी धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 22, 2023, 06:59 PM IST

'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

Amruta Deshmukh and Prasad Jawade Engagement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका गोड जोडप्याची. यावेळी त्यांनी आपली रिलेशनशिप जाहीर केली आहे. त्यांनी यावेळी गुपचूप साखरपुडा उरकला असून यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. 

Jul 22, 2023, 06:37 PM IST

मणिपूर, बंगाल अन् आता बिहार... तरुणीला विवस्त्र करुन बंद खोलीत बेदम मारहाण

Bihar Crime : बिहारच्या बेगुसरायमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणी दरम्यान मुलगी विनवणी करत राहिली पण लोकांनी तिचे ऐकले नाही.

Jul 22, 2023, 03:57 PM IST

दोन वर्षांपासून तळीयेतील गावकरी कंटेनरमध्येच; घरांचे बांधकाम अद्यापही अपूर्णच

Taliye Landslide : इरसालवाडीतील दुर्घटनेनं 2021 साली झालेल्या तळिये दरड घटनेची आठवण करुन दिली आहे. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेत 87 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या दरडग्रस्तांची आजही परवड सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्षे तळियेतील गावकऱ्यांवर ऊन, वारा पाऊस झेलत कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

Jul 22, 2023, 11:49 AM IST

Christopher Nolan... एक असा दिग्दर्शक, ज्याच्या नावावरच 'ओपेनहायमर' हाऊसफुल्ल, पाहा त्याच्याविषयीची A to Z माहिती

Oppenheimer director Christopher Nolan : कला क्षेत्रात असंच समर्पण दाखवणाऱ्या Christopher Nolan य़ा दिग्दर्शकाचा याची चांगलीच प्रचिती असावी. कारण, चित्रपटांप्रती असणारं त्याचं प्रेम आणि त्यामुळं मिळालेली लोकप्रियता फार बोलकी आहे. 

 

Jul 22, 2023, 11:31 AM IST

घराबाहेर बिस्किट आणायला गेला अन् परतलाच नाही; वसईत नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू

Vasai Accident News : वसई-विरारसह नालासोपारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच वसईत नाल्यात वाहून गेल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

Jul 22, 2023, 10:30 AM IST

सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यांमुळे सप्तशृंगी गडावर मोठं संकट; गावावर दरड कोसळण्याचा धोका

Saptshringi Gad : रायगडमध्ये दरड कोसळ्याने आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अशातच राज्यतल्या दरडप्रवण क्षेत्रांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरही दरड कोसळ्याची दाट शक्यता आहे.

Jul 22, 2023, 09:42 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ; देशात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर करतात. आज म्हणजेच 22 जुलैचा दर देखील भारतीय तेल कंपन्यांनी जाहीर केला आहे. IOCL च्या म्हणण्यानुसार, आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Jul 22, 2023, 08:52 AM IST

'15 वर्षांनंतर या आकड्यांना काही अर्थ नाही, पण..'; विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

Virat Kohli : वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 76 वं शतक ठोकलं आहे. महत्त्वाचे म्हणजे विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा 500वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. 

Jul 22, 2023, 08:17 AM IST

'मी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?

Ajit Pawar : अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे म्हटलं जात आहे. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे.

Jul 22, 2023, 07:42 AM IST