media

नरेंद्र मोदींनी मीडियाशी साधला खास संवाद

नरेंद्र मोदींनी मीडियाशी साधला खास संवाद

Oct 25, 2014, 06:18 PM IST

सलमान खानवर कोणी टाकला बहिष्कार ?

अभिनेता सलमान खानला छायाचित्रकार यांनी चांगलाच दणका दिला आहे. सल्लूचे कोणतेही कार्यकक्रम कव्हर न करण्याचा निर्णय घेतलाय. आगामी बिग बॉस -८ च्या सिजनसाठी आयोजित कार्यक्रमावर छायाचित्रकारंनी बहिष्कार टाकून सल्लूला इशारा दिलाय.

Sep 13, 2014, 07:56 PM IST

'...तर मीडियाला जमिनीत गाडून टाकेन'

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी एक धक्कादायक वक्तव्य करून एका नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी, सरळ सरळ मीडियाला धमकीच देऊन टाकलीय. 'जर राज्याचा अपमान करत राहाल तर मीडियाला जमिनीत 10 फूट खोलवर गाडून टाकलं जाईल' असं राव यांनी म्हटलंय. 

Sep 10, 2014, 10:42 AM IST

पहिली पसंती, राजकीय प्रचार `व्हॉट्सअॅप्स`वर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी नेते प्रचारांसाठी वेगवेगळे फंडे वापरताना आपण पाहिलेचं आहेत.

Mar 4, 2014, 12:58 PM IST

आंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!

टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Feb 12, 2014, 06:31 PM IST

राज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.

Feb 12, 2014, 05:18 PM IST

आम आदमी पक्षाची हवा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये :आबा

आम आदमी पक्षाची हवा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे, महाराष्ट्रात नाही, त्यामुळे राज्यात याचा काहीही फरक पडणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलं आहे, नवी मुंबईत क्रीडा महोत्सवाच्या उद्धघाटन प्रसंगी आर.आर.पाटील बोलत होते.

Jan 9, 2014, 08:56 AM IST

सेकंड इनिंग संपण्याआधी....पंतप्रधान आज बोलणार

२०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रथमच आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यातच पंतप्रधानपदाची सेकंड इनिंग संपण्याआधी ते मीडियाला सामोरे जात असल्यानं ते काय बोलतायत, याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलंय.

Jan 3, 2014, 08:32 AM IST

मीडियावर निर्बंध घालण्याची आसारामची मागणी

मीडियानं आपल्यासंबंधी नकारात्मक बातम्या देणं थांबवण्याचा आदेश देण्याचा आदेश देण्याची मागणी, सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूनं सर्वोच्च न्यायालयाकडे केलीय. सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू सध्या तरुंगाची हवा खात आहे.

Oct 8, 2013, 04:29 PM IST

मोदी मीडियाच्या जीवावर मोठे झालेत- दिग्विजय सिंग

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे मीडियाच्या जीवावर मोठे झालेले नेते आहेत. त्यांनी कुठलंही मोठं कार्य केलेलं नाही’, असा आरोप दिग्विजय सिंगांनी मोदींवर केला आहे.

Sep 11, 2013, 04:10 PM IST