ms dhoni

सेहवागचे वादळी शतक, पण सचिन झटपट बाद

इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत वीरेन्द्र सेहवागने शानदार शतक ठोकलं आहे. तब्बल दोन वर्षांनंतर त्याने हे कसोटी शतक साजरं केलं आहे. सेहवागच्या या धडाकेबाज शतकामुळे भारताची स्थिती मजबूत झाली आहे.

Nov 15, 2012, 02:21 PM IST

...अन् कॅप्टन कूल धोनीही लाजला!!!

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत चक्क लाजला... माही रेसिंग टीम इंडिया या बाईक उद्घाटनाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर धोनीने लाजून उत्तर दिले.

Nov 8, 2012, 11:56 AM IST

आणि विराट ढसाढसा रडला!

सुपर ८ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १२१ धावांत रोखता न आल्याने भारताचा टी-२० विश्वचषकातील गाशा गुंडाळला आणि यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला अक्षरशः रडू कोसळले. तो बराच वेळ रडत होता.

Oct 3, 2012, 05:21 PM IST

बाप्पा पावला! टीम इंडियाने साहेबांना लोळवले!

भारताच्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गत विजेत्या इंग्लड संघाची अक्षरशः भंबेरी उडाली. इंग्लडचा पूर्ण संघ केवळ ८० धावांमध्ये गारद झाला.

Sep 23, 2012, 10:38 PM IST

विराट बनला `वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर`

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याला ‘वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर’नं गौरवण्यात आलंय.

Sep 15, 2012, 10:49 PM IST

ऑलराऊंडर युवराज क्रिकेटचा चॅम्पियन - धोनी

धोनी म्हणतो, ‘युवराज चॅम्पियन आहे आणि त्याचं कमबॅक बघून मला खूप आनंद झालाय’.

Sep 12, 2012, 06:51 PM IST

गड गेला पण युवराज सिंह आला....

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा एक धावेने पराभव करून दोन टी-२० सामन्यांची मालिका न्यूझीलंडने खिशात घातली. या सामन्यात भारताचा एका धावेने पराभव झाला असला तरी युवराज सिंग याची पुन्हा धडाकेबाज फलंदाजी पाहून गड गेला पण सिंह आल्याचे सुख भारतीय प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसत होते.

Sep 11, 2012, 10:54 PM IST

भारतीय क्रिकेटर्सची आयसीसी पुरस्कारांमध्ये पीछेहाट

गेल्या वर्षभरात वाईट कामगिरी केल्यामुळे भारतीय कसोटी टीमचा एकही सदस्य आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये आपलं नाव मिळवू शकला नाही. ‘वर्षातील सर्वश्रेष्ठ टेस्ट क्रिकेटर’ आणि ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर’ या दोन्ही पुरस्कारांमध्येही एकाही भारतीय खेळाडूचं नाव नाही. इंग्लंड आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंचा मात्र या टीममध्ये दबदबा आहे.

Aug 30, 2012, 04:33 PM IST

धोनीची नवी इनिंग; बनणार ‘सुपर बाईक चॅम्पियन’?

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचं क्रिकेटव्यतिरिक्त ‘बाईक्स’चं प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. त्याचं हेच वेड त्याला घेऊन चाललंय मोटर रेसिंगच्या जगात! 2013मध्ये होणाऱ्या ‘सुपर बाइक चॅम्पियनशीप’च्या निमित्तानं धोनी एका नव्या इनिंगला प्रारंभ करतोय.

Aug 28, 2012, 01:38 PM IST

धोनीच्या हस्ते 'आनंदवन'ला तीन कोटींचा धनादेश

आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या महेंद्रसिंग धोनीला एका वेगळ्याच रुपात पाहण्याचा योग पुणेकरांना मिळाला. क्रिकेटमधील वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावातून जमा झालेली रक्कम धनादेशाच्या रुपात धोनीच्या हस्ते बाब आमटेंच्या आनंदवन या संस्थेला देण्यात आला.

Apr 14, 2012, 09:25 PM IST

धोनी परततोय जुन्या 'हेअरस्टाइल'कडे

लांब केस ही महेंद्रसिंग धोनीची खऱ्या अर्थानं ओळख होती. लांब केसामुळेच त्यानं साऱ्या क्रिकेटप्रेमींच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. आता पुन्हा एकदा तो आपल्या लांब केसांच्या हेअरस्टाईलमध्ये परतण्याच्या प्रयत्नात आहे.

Mar 30, 2012, 05:55 PM IST

जडेजाऐवजी युसूफ पठाणला संधी?

टीम इंडियाच्या स्पिनर्सची कामगिरी गेल्या काही मॅचेसमधून समाधानकारक झालेली नाही. त्यातच धोनीच्या आवडत्या रवींद्र जाडेजाला तर काहीच कमाल करता आलेली नाही.

Mar 15, 2012, 12:54 PM IST

'टीम इंडिया'तील वाद 'रोटेशन पॉलिसी'मुळे

टीम इंडियात वाद फक्त सिनियर्स प्लेअर्सच्या फिल्डिंगबाबत धोनीनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळेच नाही तर रोटेशन पॉलिसीवरूनही आहे. वीरूनं धोनीच्या रोटेशन पॉलिसवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

Feb 22, 2012, 06:22 PM IST

ऑस्ट्रेलियन मीडियाचे टीम इंडियावर ताशेरे

ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महेंद्रसिंग धोनी निष्क्रिय कॅप्टन असल्याच म्हणत त्यांनी धोनीलाही टीकेच लक्ष्य केलं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणनं कांगारु बॉलर्ससमोर सपशेल शरणागती पत्करली आहे.

Jan 17, 2012, 02:10 PM IST

पर्थ कसोटीत भारताचं काही खरं नाही

ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात राहुल द्रविड ४७ रन्स आणि धोनी २ रन्सवर आऊट झाले. भारताने सकाळच्या सत्रात फक्त ७७ रन्स काढल्या आहेत आणि ऑस्ट्रेलिया सामना खिशात टाकण्याची चिन्हं आहेत

Jan 15, 2012, 02:38 PM IST