ms dhoni

स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (पाचवी टेस्ट)

भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला ओव्हल मैदानात सुरूवात झालीय. टीम इंडियाची कामगिरी फारच खराब सुरू आहे. इंग्लंडनं 2-1ची आघाडी घेतलीय. आजच्या मॅचकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. 

Aug 15, 2014, 04:44 PM IST

धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी: मार्टिन क्रो

न्यूझीलंडचे महान बॅट्समन मार्टिन क्रो यांनी इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या टेस्ट क्रिकेट सीरिजमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सीवर टीका केलीय. धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी, असंही क्रो म्हणालेत. 

Aug 14, 2014, 09:02 PM IST

धोनी, कोहलीच्या नावाची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पद्मभूषण आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयनं शिफारस केली आहे. बीसीसीआयनं क्रीडामंत्रालयाकडे या दोघांच्या पुरस्कारासाठी ही शिफारस केलीय. 

Aug 13, 2014, 02:53 PM IST

“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी

 मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे. 

Aug 10, 2014, 08:01 AM IST

युवराजला डच्चू, तीन नवे चेहरे टीम इंडियात

भारताच्या इंग्लंड दौऱ्यात खेळण्यात येणाऱ्या पाच वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यांसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठीही युवराज सिंगला डच्चू देण्यात आला आहे.

Aug 5, 2014, 09:00 PM IST

स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (तिसरी टेस्ट)

 

मुंबई: भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं सुरूवात झालीय. लॉर्ड्स टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरलीय. इंग्लंडची पहिले बॅटिंग आहे. 

Jul 27, 2014, 03:58 PM IST

टीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?

भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.

Jul 27, 2014, 08:49 AM IST

धोनी ब्रिगेडनं करून दाखवलं!

इंग्लंड विरूध्दच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं 95 रन्सनं विजय मिळवत नवा इतिहास रचलायं. तब्बल 28 वर्षांनी टीम इंडियानं लॉर्डसवर विजय मिळवत पाच टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 नं आघाडी मिळवलीयं.

Jul 21, 2014, 08:33 PM IST

स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड

स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (दुसरी कसोटी)

Jul 17, 2014, 03:22 PM IST

धोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल

'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उमेदीचा काळ संपलाय. तो आता टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व करण्याच्या कामाचा नाही. त्यामुळं भारताच्या कसोटी संघाची सूत्रं त्याच्याकडून काढून ती विराट कोहलीकडं द्यायला हवीत. ती वेळ आली आहे,' असं सडेतोड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Jul 15, 2014, 04:37 PM IST

वेळापत्रक: भारत विरुद्ध इंग्लंड

भारताचा इंग्लंड दौऱ्यातील मॅचेसला आजपासून सुरूवात होतेय. आज भारत-इंग्लंड दरम्यानची पहिली टेस्ट मॅच नॉटिंघहममध्ये सुरू होतेय. 

Jul 9, 2014, 02:35 PM IST

धोनीसह द्रविडची आजपासून पहिली 'टेस्ट'!

भारतच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरुवात होतेय. पहिली टेस्ट ट्रेंटब्रिजमध्ये रंगणार आहे. 2011 च्या दौऱ्यात भारताला 4-0 नं सपाटून मार खावा लागला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असणार आहे. 

Jul 9, 2014, 01:06 PM IST

मला सर्वश्रेष्ठ व्हायचंय, सल्ल्याची गरज नाही- कोहली

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला उपरती झालेली आहे. त्यानं आपल्याला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं म्हटलंय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना कोहलीनं कोहलीनं सोमवारी स्वत:च्या खेळाचं आणि क्षमतेचं मूल्यमापन केलं.

Jul 1, 2014, 01:48 PM IST

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी विरोधात अटक वॉरंट

आंध्र प्रदेश इथल्या अनंतपूरमधल्या जिल्हा कोर्टानं एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी विरोधात अटक वॉरंट काढलाय. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 जुलैला आहे. 

Jun 24, 2014, 04:44 PM IST