स्कोअरकार्ड : भारत vs दक्षिण आफ्रिका
आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारतानं टॉस जिंकून पहिले गोलंदाजी घेतलीय. दरम्यान, पिचवर धूळ आणि ओलसरपणा असल्यानं मॅच जरा उशीरानंच सुरू झालीय.
Dec 8, 2013, 02:42 PM ISTदर्बन वनडे: भारतासाठी ‘करो या मरो’!
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गमवला होता. त्यामुळं आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष लागून आहे. आजचा सामना हा भारताच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे. हा सामना आज भारतीय वेळेनुसार दीड वाजता दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Dec 8, 2013, 10:19 AM ISTभारताचा १४१ धावांनी दारूण पराभव
जोहान्सबर्ग वन-डेत टीम इंडियाला 141 रन्सने दारुण पराभव सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार बॉलिंग लाईनअपसमोर धोनीच्या युवा ब्रिगेडनं अक्षरक्ष: नांगी टाकली.
Dec 6, 2013, 09:46 AM ISTस्कोअरकार्ड - भारत वि. द. आफ्रिका
भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याचा लाइव्ह स्कोअर
Dec 5, 2013, 05:01 PM ISTमहेंद्रसिंग धोनी जाहिरात विश्वाचा राजा, केला २५ कोटींचा करार
महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जाहिरात विश्वाचा राजा बनला आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी स्पार्टन स्पोर्टस आणि अॅमिटी युनिव्हर्सिटीबरोबर तो २५ कोटींचा करार करणार आहे. या करारानंतर धोनीच्या बॅटची किंमत असणार आहे ती २५ कोटी.
Dec 3, 2013, 11:18 PM ISTवन-डे सीरिजवर आपलं नाव कोरायला टीम इंडिया सज्ज!
टेस्ट सीरिजमध्ये २-०नं विंडीजला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय टीम आतूर असेल. धोनी अँड कपंनीनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विंडीजपेक्षा सरस ठरली आहे. आता वन-डे सीरिजमध्येही ड्वेन ब्राव्होच्या वेस्ट इंडिज टीमला व्हाईट वॉश देण्यास टीम इंडिया आतूर असणार आहे.
Nov 21, 2013, 09:03 AM ISTकोहलीची ‘विराट’ कामगिरी, आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल!
विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागं टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. उद्या म्हणजे ५ नोव्हेंबरला कोहलीचा वाढदिवस आहे. योगायोगानं त्याआधीच त्याला बर्थडे गिफ्ट मिळालंय.
Nov 4, 2013, 09:03 AM ISTरोहीतच्या `डबल सेन्चुरी`नं खेचून आणला विजयश्री
बंगळुरु वन-डेमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर ५७ रन्सनी मात केली. या विजयासह भारतीय टीमनं सात वन-डे मॅचेसची सीरिज ३-२ नं जिकंली. २०९ रन्सची धडाकेबाजा इनिंग खेळणार रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
Nov 2, 2013, 10:22 PM ISTभारताची ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात; सीरिज जिंकली!
नागपुरात मिळविलेल्या धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरू येथील सातवी वन-डे चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘धोनी ब्रिगेड’चे फलंदाज जोरदार फटकेबाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या नरकासुराचा वध करून विजयाचा दीपोत्सव झळकणार का, याची उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला आहे.
Nov 2, 2013, 01:22 PM IST<b><font color=red> भारताचा दणदणीत विजय</font></b>
टीम इंडियाने पुन्हा एकदा साडेतिनशे पार टार्गेट सहजगत्या पार करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सीरिजमध्ये 2-2ने बरोबरी साधली...
Oct 30, 2013, 01:29 PM ISTसहाव्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज!
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.
Oct 30, 2013, 09:08 AM IST<b> भारत-ऑस्ट्रेलिया चौथा सामना रद्द </b>
भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या वन डेचा लाइव्ह स्कोअरकार्ड
Oct 23, 2013, 01:30 PM IST… आणि कॅप्टन कूल बॉलर्सवर भडकतो तेव्हा!
कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सध्या चांगलाच चिडलेला बघायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी बॉलिंग करायची, हे अनुभवी गोलंदाजांना कळायला हवं. मी त्यांना बोट धरून चालायला शिकवू शकत नाही, असा संताप व्यक्त करत त्यानं मोहालीत `माती खाणाऱ्या` ईशांत शर्माला सुनावलंय.
Oct 20, 2013, 01:41 PM ISTधोनीनं कमावलं, ईशांतनं गमावलं!
बॉलर्सच्या खराब कामगिरीमुळं तिसऱ्या मोहाली वन-डेमध्ये भारताच्या पदरी पराभव पडला. धोनीची सेंच्युरी आणि कोहलीच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं कांगारुंसमोर ३०४ रन्सचं आव्हान उभं केलं होतं. मात्र भारतीय बॉलर्स कांगारुंच्या बॅट्समनला वेसण घालण्यात अपयशी ठरले. यामुळंच टीम इंडियाला तिसऱ्या वन-डेमध्ये ४ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलियानं सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली.
Oct 20, 2013, 08:42 AM ISTकांगारूंच्या पुन्हा धुलाईसाठी टीम इंडिया सज्ज!
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मोहालीत तिसरी वन-डे खेळली जाणार आहे. जयपूर वन-डेमध्ये ज्याप्रमाणे कांगारुंच्या बॉलर्सची धुलाई केली होती तशीच धुलाई मोहाली वन-डेमध्येही भारतीय बॅट्समनने करावी अशीच इच्छा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत.
Oct 18, 2013, 06:38 PM IST