लोकलचं तिकीट लवकरच मोबाईलवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 10:21 AM ISTआपच्या बेशिस्तीनं मुंबईकर त्रस्त!
आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मुंबईतली रिक्षातली सवारी आणि लोकलवारी चांगलीच चर्चेची ठरली. केजरीवाल सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीहून विमानानं आले. त्यानंतर त्यांनी थेट रिक्षातून अंधेरी स्टेशन गाठलं. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही रिक्षातूनच आले खरे मात्र यावेळी त्यांनी सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यानं काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.
Mar 12, 2014, 03:26 PM ISTमुंबई लोकलचे अपडेट आता मोबाईलवर, रेल्वेचं लोकेशनही
एखादी ट्रेन उशिरा असेल किंवा रद्द झाली असेल तर? असा प्रश्न अनेकवेळा तुमच्या समोर येतो. त्यावेळी तुम्ही चिंतीत होता. मात्र, ही चिंता मिटली आहे. कारण रेल्वेने तुमच्यासाठी रेल्वेचे अपडेट्स देण्याचा फंडा शोधून काढलाय. प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे गाड्यांचे अपडेट्स थेट मोबाईलवर पाहायला मिळू शकतात. त्यासाठी मध्य रेल्वेने मेनलाईन सेवांचे अपडेट्स आपल्या संकेतस्थळावरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
Oct 26, 2013, 09:49 AM ISTम.रे. मध्ये जन्म... रेल्वेच्या उदरात मुलीचा जन्म
चालत्या लोकलमध्ये एका महिलेनं गोंडस चिमुकलीला जन्म दिलाय. रविवारी रात्री कांजुरमार्ग आणि घाटकोपर दरम्यान लोकलमध्ये चिमुकलीचा जन्म झालाय.
Oct 29, 2012, 01:58 PM ISTमुंबईत जोरदार पाऊस, रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबईत रात्रभर बरसलेल्या पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिरानं धावत आहे. तर हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या हजेरीनं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झालीय.
Jun 28, 2012, 10:52 AM ISTमध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प
अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
Apr 26, 2012, 11:09 AM ISTरेल्वे बळींना दोन लाख, अधिकाऱ्यांवर गुन्हे
मुंबईतील लोकलमधल्या गर्दीनं तिघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. सिग्नलचा खांबाची धडक लागल्याने एक जण बाहेर फेकला गेल्या. त्याच्याबरोबर १७जणही रेल्वेबाहेर कोसळले. हे सर्वजण जखमी झालेत. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. लोकल अपघातातील मृतांच्या वारसांना १५ हजारांची तोकडी मदत देणाऱ्या रेल्वेने ही मदत वाढवून दोन लाख रूपयांपर्यंत देण्याचं जाहीर केले आहे. दरम्यान, अधिकरी आणि कर्मचाऱ्यांवर कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
Apr 19, 2012, 06:19 PM ISTलोकलची गर्दी जीवावर.. पडून ३ ठार, १५ जखमी
लोकलमधल्या गर्दीनं दोघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. २ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.
Apr 19, 2012, 05:19 PM IST'मरगळलेली म.रे.', ट्रेन ४० मिनिटे उशीराने...
मध्य रेल्वेच्या काल झालेल्या सिग्नल यंत्रणेला आग लागल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती, ती पूर्ववर्त होण्यासाठी जवळजवळ तीन दिवस लागणारं आहेत. आजही मध्य रेल्वेचा खेळखंडोबा हा सुरूच आहे. आजही मध्य रेल्वे अत्यंत धिम्या गतीने धावत आहे.
Apr 19, 2012, 09:09 AM ISTमुंबईत मेगाब्लॉक, मनमाड मार्गावर लाईनब्लॉक
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्टेशनदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर दुरुस्तीचे काम चालणार आहे. तर मनमाड-नांदेड मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २.३0 ते ६.३0 या वेळेत चिकलठाणा ते करमाडदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येईल.
Apr 14, 2012, 03:31 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक रूळावर
माटुंग्याजवळ आज सकाळी ओव्हरहेड वायरचा खांब झुकल्याने मध्य रेल्वेची वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, ही वाहतूक सुरळीत झाली आहे.
Dec 31, 2011, 12:26 PM IST