ncp

मी तापाने फणफणत होतो, बेशुद्ध पडलो आणि कधी नव्हे ते...; भुजबळांनी सांगितला जेलमधील अंगावर काटा आणणारा प्रसंग

Chhagan Bhujbal Jail Experience: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी जेलमध्ये आपल्या दिवसांचा अनुभव सांगितला आहे. एकदा आपण बेशुद्ध पडलो होतो आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी आपला राजकीय वारसदार कोण असेल याचीही घोषणा केली. 

 

Mar 19, 2023, 05:34 PM IST

Maharashtra political crisis: "मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच ठाकरेंचं सरकार पाडलं"

Thackeray vs Shinde : मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार पाडलं. बेईमानीचं बक्षीस म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं गेलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केलाय.

 

Mar 16, 2023, 04:59 PM IST

Bhaskar Jadhav Black and White: मी राष्ट्रवादी सोडायला नको होती, भास्कर जाधवांचं मोठं विधान, पण असं का म्हणाले?

Bhaskar Jadhav Black and White: कोकणातील नेते आणि ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडायला नको होता असं मोठं विधान केलं आहे. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना आपण नैतिकतेने बाहेर पडलो असं सांगितलं आहे. 

 

Mar 16, 2023, 01:29 PM IST

Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Maharashtra Budget Session 2023 :  विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. 

Mar 15, 2023, 01:40 PM IST
hasan mushrif granted relief mumbai high court video PT58S

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्याबाबत आताची मोठी बातमी

Hasan Mushrif :   माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. दोन आठवड्यांसाठी हा दिलासा दिला आहे. ईडीच्या ( ED) धाडीनंतर काल मुश्रीफ यांनी दाखल एक याचिका दाखल केली होती. शनिवारी ईडीने त्यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा मारला होता. ईडीच्या छापेमारीनंतर तब्बल तीन तासांहून अधिक काळापासून मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. याबाबत उलटसुलट चर्चो सुरु होती.  

Mar 14, 2023, 12:02 PM IST

ED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचे छापे

ED Raids Hasan Mushrif House राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ  (Hasan Mushrif)  यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आलेत. (Political News)

Mar 11, 2023, 09:04 AM IST

Maharashtra Politics: मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी सत्तेत येणार; उदयनराजे यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. 

Mar 9, 2023, 03:50 PM IST

Maharashtra Budget : 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून', मुख्यमंत्री शिंदे यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला

 Maharashtra Budget : नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही  50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेला जोरदार टोला लगावला. (Maharashtra Political News in Marathi)

Mar 9, 2023, 12:55 PM IST

Maharashtra Budget 2023: नागालँडमध्ये 50 खोके एकदम ओके झाले का? गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादीला टोला

Maharashtra Budget Session 2023: नागलँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, त्याचे पडदास महाराष्ट्रात उमटले आहेत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाने राष्ट्रवादीला या विषयावर घेरलं.

Mar 9, 2023, 12:44 PM IST

Maharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.  

Mar 9, 2023, 11:46 AM IST

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे राज्यात घेणार मॅरेथॉन जाहीर सभा, महाविकास आघाडीही सज्ज

Uddhav Thackeray Sabha :  महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) राज्यात सभा घेणार आहे. एप्रिल - मे महिन्यात प्रत्येक जिल्हात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होणार आहेत. (Maharashtra Political) दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. (Maharashtra Political News)

Mar 9, 2023, 10:37 AM IST